Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

औरंगाबादेत चोर समजून जबर मारहाण, दोघांचा मृत्यू

औरंगाबादमध्ये ९ जणांना जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत २ जणांचा मृत्यू झालाय. 

औरंगाबादेत चोर समजून जबर मारहाण, दोघांचा मृत्यू

औरंगाबाद : नागरिकांच्या बोथट होत चाललेल्या संवेदनांचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. चोर असल्याच्या संशयावरुन औरंगाबादमध्ये ९ जणांना जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत २ जणांचा मृत्यू झालाय. औरंगाबादमधल्या वैजापूर तालुक्यातली ही घटना आहे. नारळा-पारळा, रोटेगाव आणि आघुर गावातील ग्रामस्थांनी ही मारहाण केली. जखमींवर वैजापूर आणि औरंगाबादमधल्या घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मारहाण झालेले खरंच चोर होते की कामगार याचा शोध पोलीस घेत आहेत. 

Read More