Savitribai Phule Pune University Hostel: विद्यापीठामध्ये सध्या परीक्षा सुरु आहेत. सर्व विद्यार्थ्यांचे पेपर चालू आहेत.अशातच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृहात ढेकणांचा सुळसुळाट झाला आहे. ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना ढेकणांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ढेकणांच्या चाव्यामुळे विद्यार्थी शारीरिक समस्यांनी ग्रस्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच विद्यापीठातील वसतिगृहात उंदीर चावल्याची घटना घडली होती. आता विद्यार्थ्यांना परत ढेकणांचा त्रास जाणवत आहे. वसतिगृहात स्वच्छतेचा अभाव असल्यामुळे या गोष्टी घडून येत आहेत असे सांगितले जात आहे.
वसतिगृह प्रशासन व विद्यापीठ प्रशासनाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने वेळोवेळी या विषयाचा पाठपुरावा केला आहे. यावर ठोस उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. तरीसुद्धा विद्यापीठ प्रशासनाचे या गोष्टींकडे दुर्लक्ष होत चालले आहे.
ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना ढेकणांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.यामुळे विद्यार्थी शारीरिक समस्यांनी ग्रस्त झाले आहेत. वसतिगृहात स्वच्छतेचा अभाव असल्यामुळे या गोष्टी घडून येत आहेत. वसतिगृह प्रशासनाला वारंवार सांगूनही यावर ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. लवकरात लवकर विद्यापीठ प्रशासन ने यावर उपाययोजना कराव्यात अन्यथा ABVP यावर आंदोलनाची भूमिका घेईल अशा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे प्रतिनिधी शिवा बारोळे यांनी दिला.