ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई : (BJP MLA Suresh Dhas) मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनेक गौप्यस्फोट करणाऱ्या सुरेश धस यांनी आता आणखी एक खळबळजनक दावा केला आहे. ‘माझ्या हत्येचा कट रचला होता’ असा दावा आता धस यांनी केला असून, खोक्या प्रकरणावरुन मला व्हिलन ठरवण्याचा प्रय़त्न झाला” असं ते म्हणाले. खोक्यानं सुरेश धसांना हरणाचं मांस पुरवलं असं बिश्नोई समाजातील लोकांना सांगण्यात आलं होतं.बिश्नोई समाजातील लोकांमध्ये मला व्हिलन ठरवण्याचा प्रय़त्न झाल्याचा सुरश धस यांचा गंभीर आरोप.
'सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणात मला व्हिलन ठरवून माझ्या खुनाचा कट आखण्यात आला होता', असा खळबळजनक धसांनी केला. हा खोक्या हरणांना मारुन त्याचे मांस सुरेश धस (Suresh Dhas) यांना पुरवतो, असं सांगून बिश्नोई गँगचे काही लोकांना विमानानं मुंबईत आणण्यात आलं होतं असं सांगताना ही माणसं आपल्या हत्येसाठी आल्याचा दावा धसांनी केला.
माध्यमांशी संवाद साधताना धस यांनी ही बाब उघडकीस आणली. खोक्याशी नाव जोडलं गेल्यानं धसांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. ज्यानंतर आता याच खोक्याचं नाव घेत धसांनी एक मोठा दावा केल्यानं संपूर्ण राजकीय वर्तुळाच्या नजरा इथंच वळल्या. धस यांनी झी २४ तासशी संपर्क साधताना खोक्याच्या सर्व कारनाम्यांसंदर्भातील आरोपांवर त्यांनी उजेड टाकला.
'मी माझ्या आयुष्यात 16 वर्षे माळकरी राहिलेला माणूस असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे मी करतोय. हरणाच्या मांसापर्यंत कधीच गेलो नाही. मी पशू-पक्ष्यांवर प्रेम करणारा माणूस आहे', असं म्हणत त्यांनी विरोधकांचा खोक्यानं मांस पुरवल्याचा दावाही फेटाळून लावला. मुख्यमंत्र्यांपर्यंत आपण सदर प्रकरण पोहोचवणार असून यापाठीमागे नेमकं कोण कोण लोकं आहेत हे मला ठाऊक असल्याचंही धस म्हणाले.