Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

खाकी वर्दीला डाग! 'या' कारणासाठी फौजदार बनला चोर

अमित सुतारने आता थेट मोटार सायकलींकडे मोर्चा वळवला. वर्षभरातच त्याने दोन साथिदारांसह तब्बल 6 मोटार सायकली चोरल्या.

खाकी वर्दीला डाग! 'या' कारणासाठी फौजदार बनला चोर

महेंद्र मुधोळकर झी 24 तास बीड : चोरीची घटना घडली की आपण पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतो. पण पोलीसच जर चो-या करत असतील तर करणार काय...? चक्रावलात. बीडमध्ये एका पोलीस उपनिरीक्षकालाच चोरीच्या आरोपात अटक करण्यात आलीये. पोलिसांच्या गराड्यात चेहरा लपवणारी ही व्यक्ती कोणी सराईत गुन्हेगार नाही. तर हा आहे बीडमधील सहाय्यक पोलीस उपनिरीक्ष अमित सुतार. आपल्या 2 साथिदारांसह त्यानं 6 मोटारसायकली चोरल्यात. पोलीस असून चोरी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.. त्याला कारणही तसंच आहे. अमित सुतारला ऑनलाईन जुगाराचं व्यसन लागलं. वेगवेगळ्या ऑनलाईन गेमिंगमध्ये तो पैसे हरला.

डोक्यावर कर्जाचा डोंगरच उभा राहिला. पगाराचे पैसेही पुरेना. त्यामुळे अमित सुतारने चोरीचा मार्ग निवडला. सुरुवातीला त्याने पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयातच डल्ला मारला. पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयातील इन्व्हर्टच्या 58 बॅट-या त्यानं चोरल्या. या आरोपाखाली त्याला शिक्षाही झाली. या घटनेनंतर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी त्याला निलंबित केलं. मात्र जामीनावर सुटताच तो पुन्हा ऑनलाईन जुगार खेळू लागला. लोकांकडून घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी त्याने पुन्हा चोरीचा सपाटा लावला. 

अमित सुतारने आता थेट मोटार सायकलींकडे मोर्चा वळवला. वर्षभरातच त्याने दोन साथिदारांसह तब्बल 6 मोटार सायकली चोरल्या. याप्रकरणी पोलिसांनी अमित सुतारसह त्याच्या दोन साथिदारांना पुन्हा अटक केलीये. त्याला न्यायालयात हजर केलं असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीये.

 

Read More