Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

धनंजय मुंडे पुन्हा मोठ्या अडचणीत; विनयभंग प्रकरणातील आरोपींसोबतचा फोटो व्हायरल

बीड विनयभंग प्रकरणातील आरोपीचे आमदार धनंजय मुंडेंसोबत चे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे बीडमध्ये नवा वाद सुरु झाला आहे.

 धनंजय मुंडे पुन्हा मोठ्या अडचणीत;  विनयभंग प्रकरणातील आरोपींसोबतचा फोटो व्हायरल

Beed crime news: बीड शहरातील खासगी क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली.  या प्रकरणी दोन शिक्षकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  त्यांना अटक केल्यानंतर काल बीड न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.  आमदार धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर आता बीड विनयभंग प्रकरणातील आरोपीचे आमदार धनंजय मुंडेंसोबत चे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

बीड विनयभंग प्रकरणातील आरोपींवर गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर हे आरोपी सोबत होते. त्यांचे सीडीआर काढा आणि एसआयटी मार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी धनंजय मुंडेनी केली‌.  बीडमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात धनंजय मुंडे आक्रमक झाले आहेत. मुंडे यांनी थेट आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतरही क्षीरसागर आरोपीसोबत होते असं धनंजय मुंडे यांनी म्हटल आहे. तसंच पोलीस तपासावरही त्यांनी शंका व्यक्त केली असून प्रकरणाची SIT चौकशी करण्याची गरज असल्याचं मुंडे यांनी म्हटल आहे.  

पत्रकार परिषदेनंतर आज बीड जिल्ह्यात सोशल मीडियावर आरोपी विजय पवार याचे आमदार धनंजय मुंडेंसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत यामुळे जिल्ह्यात चर्चांना उधाण आलंय. बीड अल्पवयीन अत्याचार प्रकरण गंभीर असून आरोपींवर कारवाई होणे गरजेचं असल्याचं पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटल आहे. आरोपी हा आरोपी असतो कोणचाही लेफ्ट किंवा राईट हॅण्ड नसतो..आरोपींवर कठोर कारवाई होणे गरजेचं असल्याचही पंकजा मुंडे यांनी म्हटल आहे.

 

Read More