Beed Crime News : एकीकडे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा होत असतानाच बीडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेवर अत्याचार झाला आहे. बीडमध्ये पोलीस कर्मचाऱ्यानेच महिलेवर अत्याचार केला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला आहे. पिडीत महिलेच्या तक्रारीवरुन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बीडच्या पाटोदा शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे. जागतिक महिला दिनीच पोलीस कर्मचाऱ्याकडून महिलेवर अत्याचार करण्यात आला आहे. पुण्याहून बीडला येणाऱ्या महिलेला पाटोदा येथेच बसमधून उतरवण्यात आले. यानंतर ही महिला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेली असता तिच्यासह अत्यंत धक्कादायक घटना घडली.
पीडित महिला पाटोदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेली होती. यावेळी येथे कार्यरत असलेला पोलिस कर्मचारी उद्धव गडकर यांनी विनयभंग केल्याची तक्रार पीडित महिलेले केली आहे. आरोपी पोलिस कर्मचारी उद्धव गडकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले नाही. मात्र, अद्याप आोरपीला अटक करण्यात आलेली नाही.
नवी मुंबईत भंगार वेचक महिलेवर लैंगिक अत्याचार करणा-याला वाशी पोलिसांनी अटक केलीय. पीडित महिलेच्या मदतीने आरोपीचे रेखाचित्र काढून त्याचा शोध घेण्यात आला. दरम्यान कोपरखैरणे पोलीस ठाण्यात अत्याचाराच्या प्रकरणात अटक आरोपीचा चेहरा रेखाचित्राशी जुळत असल्याची माहिती मिळाली होती.
लातूरमध्ये बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडलीय. पोटच्या मुलीवर बापाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केलाय. आईच्या फिर्यादीवरून नराधम बापाला अटक करण्यात आलीय.
गडचिरोलीच्या भामरागडमध्ये मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केलाय. दरम्यान पालकांच्या तक्रारीनंतर नराधम मुख्याध्यापक रवींद्र गव्हारेला पोलिसांनी अटक केलीय..