Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

जमावबंदीचे आदेश डावलण भाजप आमदाराच्या अंगलट

धस यांच्यासह सत्तर जणांवर शिरूर पोलिसांत गुन्हा

जमावबंदीचे आदेश डावलण भाजप आमदाराच्या अंगलट

बीड : जमावबंदीचे आदेश डावलून कार्यक्रम घेणे भाजप आमदार सुरेश धस यांच्या चांगलच अंगलट आलय. धस यांच्यासह सत्तर जणांवर शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल झालाय. जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेश लागू आहेत असे असतानाही सुरेश धस यांनी शिरूर येथील मंगल कार्यालयात ऊसतोड कामगारांचा मेळावा घेतला होता. 

fallbacks जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिरूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

यापूर्वी दोन वेळा सुरेश धस यांच्यावर जमावबंदी आदेश डावलल्या प्रकरणी गुन्हे दाखल झालेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचे जमावबंदीचे आदेश असताना आणि शिरुर शहरात कोरोनाचे रुग्ण आहेत हे महिती असतानाही जमाव झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यामुळे या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Read More