Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

बीडच्या 'खोक्या भाऊ'चा आणखी एक कारनामा; हरिण आणि मोरांची शिकार...

Beed News Today: बीडच्या शिरूर कासार सतीश भोसले उर्फ खोक्याचे एक एक कारनामे समोर येत आहेत. 

बीडच्या 'खोक्या भाऊ'चा आणखी एक कारनामा; हरिण आणि मोरांची शिकार...

Beed News Today: बीडमध्ये एका व्यक्तीला बॅटनं मारहाण करणारा आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्या याचे आणखी कारनामे उघडकीस आले आहेत. खोक्या अद्यापही फरार असून त्याच्या शोधासाठी शिरूर पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत. दरम्यान, सतीश भोसलेचे अन्य कारनामेही आता हळूहळू उघड होऊ लागले आहेत. 

सतीश भोसले उर्फ खोक्या लॅव्हिश लाईफ जगण्याबरोबरच खोक्याला हरण, ससा, मोर अशा वन्य जीवांचं मांस खाण्याचीही आवड होती. शेतात हरण पकडण्यासाठी लावलेल्या  सापळ्यावरुन त्यानं दिलीप ढाकणे आणि त्यांच्या मुलाला मारहाण केली होती. रक्तबंबाळ अवस्थेत ढाकणे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले होते. मात्र त्यादरम्यान गुन्हा दाखल झाला नव्हता खोक्याचे कारनामे समोर आल्यानंतर त्याच्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहे. गुन्हे दाखल झाल्यानंतर तो अद्यापही फरार आहे.

लॅविश लाईफ जगण्याबरोबरच खोक्याला हरण, ससा, मोर असे प्राणी खाण्याची आवड होती. त्यामुळे तो त्यांची शिकार करत होता. त्यामुळे हरण पकडण्याच्या जाळ्यावरूनच त्याने ढाकणे पिता पुत्राला मारहाण केली होती. त्याच्यावर दोन गुन्हे दाखल झाल्यानतंर तो फरार झाला त्याच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथकं पुणे आणि अहिल्यानगर येथे रवाना झाली आहेत.

कोण आहे सतीश भोसले उर्फ खोक्या

सतीश भोसले उर्फ खोक्या भाऊचे अनेक व्हिडीओ सध्या समोर येत आहेत. अलीशान गाड्या, नोटांचे बंडल आणि गळ्यात सोन्याच्या चेन घालून फिरताना दिसत आहे. यावरुनच सतीश भोसले याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची असल्याचे दिसते. कोण आहे हा खोक्या जाणून घेऊया. सतीश भोसले हा एक सामान्य पारधी कुटुंबातील असून त्याच्याकडे राहायला साधं घरदेखील नाहीये. मात्र तो आपल्या मित्रांसोबत लॅविश लाईफ जगतो. बीडच्या शिरूर शहराजवळ पारधी वस्तीवर तो राहतो. गेल्या पाच ते सात वर्षांपासून सक्रिय राजकारणात सहभागी आहे. शिरूर कासार परिसरात सतीश भोसलेची खोक्या पार्टी नावाने दहशत आहे. व्हीआयपी कल्चर व्हीआयपी गाड्या आणि सोन्याचे ब्रेसलेट आणि गंडे गोल्डमॅन म्हणूनही स्थानिक पातळीवर ओळख असून पार्टी खोक्या आणि गोल्डमॅन ही टोपण नावे

खोक्याचे शिरूर परिसरात तरुणांमध्ये मोठे आकर्षण. नेहमी गराडा आणि ताफासोबत असतो. मारहाणीचे व्हिडिओ समोर आल्यानंतर सतीश भोसले खोक्याचे गुन्हेगारीचे कारनामे समोर. अनेकांना मारहाण केली मात्र तक्रार देण्यासाठी कोणी पुढे आले नाही. खोक्याला राजकीय पाठबळ गुंडगिरी आणि दहशत असल्याचे बोलले जात आहे. 

Read More