संतोष देशमुख हत्या प्रकरणान संपूर्ण महाराष्ट्र राज्य हादरुन गेला. या प्रकरणाच्या तपासामध्ये आणि आरोपींना गजाआड करण्यामध्ये काळ्या रंगाच्या कारनं मोलाची भूमिका पार पाडली. या कारमुळे आरोपींविरोधात पोलिसांच्या हाती अनेक सबळ पुरावे हाती लागले. तसंच आका वाल्मिक कराडच्या काळ्या गँगचे काळे कारनामे उघड झाले.
संतोष देशमुख हत्येत पोलिसांच्या हाती पुराव्यांची कार
काळ्या कारमध्ये आरोपींविरोधात तब्बल 19 पुरावे
कारमधील पुराव्यांमुळं आरोपी अडकले
संतोष देशमुख हत्या प्रकरणातही हीच ती काळ्या रंगाची कार, ही कार आरोपींविरोधात पुरावे गोळा करण्यासाठी अतिशय महत्वाची ठरली आहे. कारण याच कारमधून संतोष देशमुखांचं अपहरण करण्यात आलं होतं. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर याच कारमधून आरोपी पळून गेले होते. 11 डिसेंबर 2024ला धाराशिवच्या कळंबमधून पोलिसांनी ही कार ताब्यात घेतली. या कारमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 19 पुरावे पोलीस आणि सीआयडीच्या हाती लागले
- आरोपींनी वापरलेले 3 मोबाईल कारमध्ये सापडले
- आरोपींचे दोन काळ्या काचांचे गॉगलही मिळाले
- सुदर्शन घुलेनं वापरलेलं काळ्या रंगाचं जॅकेटही सापडलं
- मारहाणीत वापरलेला 41 इंच लांबीचा पाईप मिळाला
- सुदर्शन घुलेचं एटीएम कार्ड, पॅनकार्ड
- लोखंडी पाईपला क्लच वायर गुंडाळून तयार केलेलं हत्यार
- सीट कव्हरवर सापडलेला रक्ताचा डाग
हे पुरावे पोलिसांना एका काळ्या रंगाच्या कारमध्ये सापडले. संतोष देशमुखांचं अपहरण झालं होतं तेव्हा या काळ्या रंगाच्या कारबाबत केज पोलिसांना माहिती देण्यात आली होती. पण पोलिसांनी त्यावेळी हालचाल केली नसल्याचा आरोप होतोय.
सध्या ही कार पोलिसांच्या ताब्यात आहे. सुदर्शन घुले याची ती काळी कार असल्याचं सांगण्यात येत आहे. आता या कारमुळंच वाल्मिकच्या गँगचे काळे कारनामे उघडलीस आले आहेत.