Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

तो' आयफोन, महागड्या कार अन् हाय प्रोफाइल भागात संपत्ती; Deleted डेटा रिकव्हर होताच कराडचा पाय खोलात

Walmik Karad: वाल्किम कराडभोवतीचा फास आणखी आवळला जाण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराडच्या गाड्या जप्त करण्यात येऊ शकतात.   

तो' आयफोन, महागड्या कार अन् हाय प्रोफाइल भागात संपत्ती; Deleted डेटा रिकव्हर होताच कराडचा पाय खोलात

Walmik Karad: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील क्रमांक एकचा आरोपी वाल्मिक कराडच्या भोवतीचा फास आणखी आवळला जाणार आहे. वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी असल्याचे पुरावे सीआयडीच्या हाती लागले आहेत. आरोपी वाल्मिक कराडसंदर्भात आणखी धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. 

आरोपी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींचे मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. कराडकडे तीन महागडे आयफोन होते. त्यातील 16 प्रो या फोनची किंमत साधारण तीन लाखांपर्यंत आहे. तर इतर फोन दीड ते दोन लाखांच्या घरात आहे. याबरोबरच वाल्मिक कराडच्या लक्झरी गाड्या जप्त करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला आहे. 

वाल्मीक कराड फरार असताना त्याने आयफोनमधील डेटा डिलीट केला होता. मात्र एसआयटी पथकाने तंत्रज्ञानाची मदत घेऊन हा डेटा रिकव्हर केला आहे. त्यानंतर तपास यंत्रणेच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे. राज्यात अनेक ठिकाणी कराडच्या मालमत्ता आहेत पुण्यातील हाय प्रोफाईल समजल्या जाणाऱ्या मगरपट्टा सिटी आणि एफसी रोड भागात जवळपास 115 कोटींची संपत्ती असल्याची माहिती आहे. 

वाल्मिक कराडकडे आहेत 'या' महागड्या कार

- फोड इंडेवर 

- जॅग्वार लँड रोवर इंडिया 

- जेसीबी इंडिया लिमिटेड 

- अशोक लेलँड (हायवा) 

- मर्सडीज बेंज इंडिया 

- बीएमडब्ल्यू यासह आणखी लक्झरी गाड्या कराड कडे असल्याची शक्यता आहे.

धनंजय मुंडे यांचा राजीनामा

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आरोपपत्रातून समोर आलेल्या फोटोनंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. धनंजय मुंडेंचा मंत्रि‍पदाचा राजीनामा चर्चेत असला तरी आता थेट त्यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. धनंजय मुंडे यांचा विधीमंडळ सदस्य पदाचा राजीनामा घ्या, अशी मागणी पुण्यातील मराठा समाज बांधवांनी केली आहे. मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर मुंडे यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा यासाठी मराठा समाज आग्रही असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे

Read More