Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

बीडमध्ये अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ; मुख्यमंत्र्यांकडून एसआयटीची घोषणा!

Beed Crime: बीडमधील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एसआयटीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.

बीडमध्ये अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ; मुख्यमंत्र्यांकडून एसआयटीची घोषणा!

Beed Crime: बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळावरून माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केलेत. या प्रकरणातील आरोपी क्षीरसागर यांचा जवळचा असल्याचा दावा मुंडेंनी केलाय. मुख्यमंत्र्यांची भेट घेत धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली होती. आता या प्रकणात मुख्यमंत्र्यांची एसआयटीची घोषणा केलीय.

बीडमधील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एसआयटीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. महिला आयपीएस अधिका-याच्या नेतृत्वात ही एसआयटी चौकशी होईल असं फडणवीसांनी विधानसभेत जाहीर केलं. बीड अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आमदार संदीप क्षिरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत एसआयटी चौकशीची मागणी केली होती.

मी कधीही कुणावर बदनाम करण्यासाठी आऱोप केलेले नाहीत. कधीच कुणावर खोटे आरोप केलेले नाहीत.एसआयटी चौकशीमध्ये सगळं उघडं पडणार असल्याचं म्हणत धनंजय मुंडे यांनी आमदार संदीप क्षिरसागर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.

तर धनंजय मुंडे यांना मंत्रिपद गेल्याचं दुःख अद्यापही असल्याचा पलटवार आमदार संदीप क्षिरसागर यांनी धनंजय मुंडेंवर केलाय. तर या प्रकरणात धनंजय मुंडेंनी आक्रमक भूमिका घेतली तशी मस्साजोग प्रकरणात का घेतली नाही? असा सवाल क्षिरसागर यांनी उपस्थित केलाय.

बीडमधील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आता माजी मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार संदीप क्षिरसागर एकमेकांसमोर उभे ठाकल्याचं पाहायला मिळतंय. या प्रकरणातील आरोपी आणि संदीप क्षिरसागर यांचे जवळचे संबंध असल्याचा दावा करत धनंजय मुंडेंनी क्षिरसागर यांच्यावर आरोप केलेत. आता या प्रकरणाची एसआयटी चौकशी होणाराय.यानंतर नेमकं काय खरं ते बाहेर येणाराय.

बीडमध्ये गुन्हेगारीचा नवा पॅटर्न, व्हिडीओ रेकॉर्ड करुन दहशत माजवण्याचा नाद

बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर हाणामारीचे व्हिडिओ चित्रित करून समाज माध्यमावर वायरल करण्याचा ट्रेंड बनला आहे. या माध्यमातून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र आता असे व्हिडिओ चित्रित करून व्हायरल करणारे बीड पोलिसांच्या रडारवर असणार आहेत. जो व्यक्ती हाणामारीचे व्हिडिओ चित्रित करून वायरल करेल त्याला देखील आरोपी करणार असल्याचं पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी सांगितले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात वादविवाद होतात. हत्या खून किरकोळ मारामाऱ्या देखील आपण पाहत आलोयत. मात्र बीड मधील सतत होत असलेले व्हायरल व्हिडिओ त्यामुळे बीडची बदनामी मोठी झाली आहे. व्हायरल व्हिडिओ समाज माध्यमात फिरतात आणि बीडमध्ये किती दहशतवाद ठासून भरलाय, याची प्रचिती येते. पोलीस अधीक्षकांनी घेतलेल्या या निर्णयावर बीडच्या नागरिकांनी मात्र आनंद व्यक्त केला आहे. संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण तमाम महाराष्ट्रात गाजले. या प्रकरणानंतर अनेक वायरल व्हिडिओने अक्षरश: धुमाकूळ घातला. यामुळे नागरिक देखील मोठ्या दहशतीत राहिले. पोलिसांनी घेतलेला हा निर्णय समाजाभिमुख असल्याचे बीडचे तरुण सांगतात. बीडची गुन्हेगारी पाहता गृह विभागाने नवनीत काँवत या तरुण आयपीएस अधिकाऱ्याला बीडच्या पोलिस अधीक्षक पदाची धुरा सोपवली गेली. त्यानंतर मात्र पोलीस अधीक्षकांनी अनेक गॅंगवर मकोकासारख्या कायद्याअंतर्गत कारवाई करत बीडचं दूषित झालेलं वातावरण सावरण्याचा प्रयत्न केलाय. आता चक्क व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावरच कारवाईचा बडगा उगारल्यामुळे हाणामारीच्या घटना आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याला रोख बसणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Read More