Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

बीडच्या विद्यार्थ्याची रॅगिंगमुळे आत्महत्या ?

 बीएएमएस प्रथम वर्षात शिकणाऱ्या गणेश कैलास म्हेत्रे या विद्यार्थ्यांची आत्महत्या 

बीडच्या विद्यार्थ्याची रॅगिंगमुळे आत्महत्या ?

शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : लातूर जिल्ह्याच्या उदगीर येथील धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयात बीएएमएस प्रथम वर्षात शिकणाऱ्या गणेश कैलास म्हेत्रे या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली आहे. बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यातील आपल्या मुळ गावी जाऊन गणेशने आत्महत्या केली होती. 

१९ वर्षीय गणेशच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबियांना उदगीरच्या धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयात रॅगिंग होत असल्याचा आरोप केलाय. या रॅगिंगला कंटाळूनच गणेशने आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांचा गंभीर आरोप आहे. याबाबत धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयातील प्रथम विद्यार्थ्यांनी रॅगिंग होत नसली तरी सिनिअर्स हे ओळख परेड घेत असल्याचे म्हटले आहे. 

तर महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी रॅगिंगचे आरोप फेटाळून लावले असून असा कुठलाही प्रकार आपल्या महाविद्यालयात होत नसल्याचे म्हटले आहे. जर पोलीस तपासात असे काही निदर्शनास आले तर संबंधित विद्यार्थ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही प्राचार्य दत्तात्रय पाटील यांनी दिला आहे.

Read More