Fake Loan App : चीनी अॅपमधून त्वरीत कर्ज घेत असाल तर सावधान व्हा. त्वरीत कर्ज मिळवण्यासाठी तुम्ही जर कोणतंही अॅप डाऊनलोड करात असाल तर थांबा... कारण तुमच्या एका चुकीमुळे तुम्हाला लाखोंचा फटका बसू शकतो.
बाजारातील अनेक चिनी अॅप्सचा तुमच्या पैशांवर डोळा आहे. तुम्ही जर मोबाईलवरून तातडीने कर्ज घेत असाल तर सावधान राहा. कारण सध्या कमी व्याजदरात कर्ज देणा-या चिनी अॅप्सचा सुळसुळाट झालाय. स्वस्तात कर्ज घेणाच्या घाईत तुम्हाला लाखोंचा गंडा घातला जावू शकतो. अनेक गरजू लोक या चिनी अॅप्सना बळी पडतायत. कमी व्याज दरात आणि त्वरीत कर्ज देण्याचं आश्वासन देत फसवणूक करण्याचा उद्योग आता चिनी भामट्यांनी सुरु केलाय. मुंबई, पुण्यासारख्या मेट्रो शहरांमधील अनेकजण या चिनी अॅप्सच्या जाळ्यात अडकलेत.
हेही वाचा : बिग बॉस स्पर्धक माहिरा शर्माला डेट करतोय सिराज? क्रिकेटरने स्वतः केला खुलासा, पापाराझींना केली विनंती
चिनी अॅपद्वारे 5 ते 25 हजार रुपयांपर्यंतच्या कर्जाची गरज असणारे टार्गेट असून गरजूंना कमी व्याजदरात आणि त्वरीत कर्जाचं आमिष दाखवलं जातं. कर्जासाठी एक अॅप डाऊनलोड करायला सांगितलं जातं. अॅप डाऊनलोडनंतर ग्राहकांच्या खासगी माहितीची चोरली जाते. ग्राहकांच्या फोटो आणि कॉन्टॅक्ट्सची चोरी होते. खासगी माहितीच्या आधारे ग्राहकांचं ब्लॅकमेलिंग आणि बदनामीची धमकी देत पैसे उकळले जातात.
सध्याच्या घडाली 30-35 फसवे अॅप बाजारात आहेत. त्यामुळे कर्ज घेताना घाई करू नका आणि काळजी घ्या असं आवाहन सायबर पोलिसांनी केलंय. त्यामुळे तत्काळ कमी व्याजदरात कोणतं अॅप तुम्हाला कर्जाचं आमिष दाखवत असलेत तर राहा सावधान.