Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मराठी भाषेबद्दलच्या 'त्या' विधानावर भैयाजी जोशींचे स्पष्टीकरण, 'मुंबईची भाषादेखील...'

Bhaiyaji Joshi On Marathi:  भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेबद्दल केलेल्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. 

मराठी भाषेबद्दलच्या 'त्या' विधानावर भैयाजी जोशींचे स्पष्टीकरण, 'मुंबईची भाषादेखील...'

Bhaiyaji Joshi On Marathi: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी कार्यवाह भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेसंदर्भात विधान केले. विद्याविहार येथे आयोजित नामांतराच्या कार्यक्रमात ते मुंबई आणि मराठी भाषेविषयी बोलले. यानंतर विधानसभेत गदारोळ झाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील यावर संताप व्यक्त केला. दरम्यान भैयाजी जोशी यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. 

काय आहे प्रकरण?

मुंबईत येणा-या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही, असं विधान आरएसएसचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केलं होतं. घाटकोपरची भाषा गुजराती आहे.  मुंबईची एक भाषा नाही मुंबईच्या अनेक भाषा आहेत, असे विधान भैयाजी जोशी यांनी केले.

भैयाजी जोशींनी काय दिले स्पष्टीकरण?

माझ्या वक्तव्यानं गैरसमज झाल्याचे भैयाजी जोशी म्हणाले.  मी स्वत:मराठी भाषिक आहे. अंतकरणामध्ये मराठी भाषेचा अभिमान माझ्यात आहे. मी सर्व भाषांच्या सहअस्तित्वाचा सन्मान करतो. महाराष्ट्राने याचे उदाहरण जगासमोर ठेवलंय. मुंबईची भाषादेखील मराठी आहे. मुंबईत बहुभाषिक लोकं आहेत. बाहेरुन येणाऱ्या व्यक्तीने मराठी शिकावी.

Read More