Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Crime: महाराष्ट्र हादरला! वकिलाचे भयानक कृत्य; मुलीच्या मैत्रिणीवर केला लैंगिक अत्याचार

वकीलच कायद्याचे भान विसरला. वकिलाने मुलीला घरी खेळायला बोलवायला आलेल्या शेजारच्या चिमुकलीवर अत्याचार केला आहे.

Crime: महाराष्ट्र हादरला! वकिलाचे भयानक कृत्य; मुलीच्या मैत्रिणीवर केला लैंगिक अत्याचार

Bhandara Crime News : अन्याय झालेल्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करणाऱ्या वकिलानेच धक्कादायक कृत्य केले आहे. एका वकिलाने मुलीच्या मैत्रिणीवरच लैंगिक अत्याचार केला आहे. भंडारा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आरोपी वकिलाला पोलिसांनी अटक केली आहे.   

शेजार धर्माला काळिमा फासणारी ही संतापजनक घटना भंडारा शहरातील एका सोसायटीत घडली आहे. एका वकिलाने त्याच्या मुलीला खेळायला बोलवायला आलेल्या शेजारच्या एका 11 वर्षीय मुलीला खोटे बोलून घरात घेतले आणि तिच्यावर अत्याचार केला. त्याप्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचारासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी नराधमाला तासाभरातच बेड्या ठोकल्यात. विजय रेहपाडे असे अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव असून तो व्यवसायाने वकील आहे. पीडितेच्या आईंच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

पिडीत मुलगी आई आणि 13 वर्षीय भावासोबत राहते. पीडित मुलीचे वडील शासकीय नोकरीत असून ते नोकरीनिमित्त दुसऱ्या ठिकाणी राहतात. पीडिता आणि आरोपी विजय रेहपाडे याची मुलगी समवयस्क असल्याने दोघींमध्ये मैत्री झाली. मागील काही महिन्यांपासून दोघींचे एकमेकींच्या घरी येणे-जाणे आहे. दोघीही सोसायटीचे परीसरात सोबत खेळत असतात

घटनेच्या दिवशी पीडिता रोजच्याप्रमाणे सायंकाळच्या सुमारास सोसायटी परिसरात खेळण्याकरीता गेली. मात्र, अर्धा तासातच ती घरी रडत रडत परत आली. त्यावेळी आईने “ती का रडत आहे ?  असे विचारले. मात्र तिचे रडणे थांबत नसल्याने आईने तिला बेडरुममध्ये नेले आणि रडण्याचे कारण विचारले. त्यावेळी पीडित अल्पवयीन मुलीने आईला आपबिती सांगितली. लागलीच भंडारा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी वकिलाला अटक करण्यात आली आहे.

 

 

Read More