Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

कोरेगाव भीमाप्रकरणात महाविकास आघाडीत मतभेद ?

एनआयएनं पुणे सेशन कोर्टात धाव घेतल्यानंतर मात्र महाविकासआघाडीत मतभेद

कोरेगाव भीमाप्रकरणात महाविकास आघाडीत मतभेद ?

पुणे : कोरेगाव भीमासह एल्गार परिषद आणि अर्बन नक्षल प्रकरणाचा तपास एनआयएनं आपल्या हातात घेतला. त्यावरून राज्य सरकार आक्रमक झालं होतं. पण एनआयएनं पुणे सेशन कोर्टात धाव घेतल्यानंतर मात्र महाविकासआघाडीत मतभेद निर्माण झाले. 

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वारंवार एनआयएनच्या तपासाला विरोध केला. पण एनआयएच्या अधिकार कक्षाबाबत विचारविनिमय केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एल्गार परिषद, अर्बन नक्षल प्रकरणात तपास एनआयएकडे देण्यात मंजुरी दिली. हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख विश्वासात न घेता परस्पर घेतल्याची चर्चा आहे.

त्यावरून शिवसेना-राष्ट्रवादीत मतभेद उघड झाल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर आधी गृहमंत्री अनिल देशमुख आणि आता राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांचा निर्णय आम्हाला मान्य असल्याचं जाहीर केलं. 

Read More