Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

आली रे आली तडकडताई.. काळा मुखवटा, हातात सूप घेऊन सांगली शहरात धावणारी तडकडताईची काय आहे अनोखी परंपरा?

महिषासुर मर्दिनीचा अवतार म्हणून तडकताई ओळख आहे. 

आली रे आली तडकडताई.. काळा मुखवटा, हातात सूप घेऊन सांगली शहरात धावणारी तडकडताईची काय आहे अनोखी परंपरा?

आली रे आली तड्कडताई..भुताची आई, अशी आरोळी सध्या सांगलीच्या रस्त्यांवर ऐकू येत आहे..ही तडकडताई पाहून मुलं धावत सुटतात.. काळी साडी,तोंडावर मुखवटा आणि हातात सूप घेऊन रस्त्यावर धावणाऱ्या तडकडताईच्या मागे पुढे हजारो मुलांचा गलका असतो,ज्यामध्ये या तडकडताईच्या सुपांचा प्रसाद मुलांना खावा लागतो..पाहूया काय आहे,या सांगलीच्या तडकडताईची परंपरा.

सांगलीच्या रस्त्यांवर सध्या तडकडताई प्रकट झाली आहे. त्यामुळे बाल गोपाळांची पाळता भुई थोडी झाली.अंगावर काळी साडी, तोंडावर मुखवटा आणि हातात सूप,अशा रुपात प्रकट झालेली तडकडताई कोणा भुताचा अवतार नसून देवीचा अवतार म्हणून ओळखली जाते. दृष्टांचा संहार करणारी अश्या तडकडताईची ओळख आहे

काय आहे तडकडताईची परंपरा..?

महिषासुर मर्दिनीचा अवतार म्हणून तडकताई ओळख आहे. भावई यात्रेच्या निमित्ताने जोगण्या उत्सवाला सुरुवात होते. जोगण्या उत्सव हा जेष्ठ अमावास्यनंतर सुरु होतो. अमावस्येच्या दिवशी तडकडताईचा लग्न सोहळा पार पडतो. त्यानंतर शहरातल्या गल्ली मधून तकडकड ताईचा संचार सुरू होतो

अंगावर साडी,तोंडावर काळा मुखवटा, हातात सूप असा तडकडताईचा अवतार असतो. देवीचा अवतार आणि दैत्यांचा संहार करणारी म्हणून तडकडताईची ओळख आहे. 

तडकडताई भुताची आई,अशी आरोळी सांगली शहरातल्या गल्ल्या- गल्ल्यांमध्ये ऐकू येते आहे,हजारो मुलांचा गलका तडकडताईच्या मागेपुढे काळे म्हणत धावताना पाहायला मिळतो,काळी साडी, मुखवटा आणि हातात सूप घेऊन धावणारी ही तडकडताई मुलांना सुपांचा मार देखील देते. सांगली शहरातल्या गावभाग येथील कुंभार कुटुंबाकडून तडकडताईची परंपरा वर्षानुवर्ष जोपासली जात आहे. जेष्ठ महिन्यात अमावस्येला भावई यात्रेत जोगण्या उत्सवाला सुरवात होते. अमावास्यच्या दिवशी तडकड ताईचा जोगत्या त्याबरोबर विवाह पार पडतो आणि त्यानंतरही तडखळता येईल शहरातल्या कल्याणमध्ये संचार करू लागते. 

खोड्या करणाऱ्या बालकांना आपल्या सुपने प्रसाद देते,या सुपाचा मार बसला की, मुलांवरील इडा पिडा टळते, अशी अख्याइका आहे. अमावस्येचा हा कार्यक्रम पार पडल्यानंतर आषाढातल्या पौर्णिमेपर्यंत शहरातील ठराविक भागात जाऊन ती जोगवा मागते.तडकडताईचा दरारा हा खूप मोठा आहे.अनेक लहान मुलेच नाहीत तर मोठी मुलेही या तड्कडताई ला प्रचंड घाबरतात. 

 तडकडताईची अश्या या परंपरेला कोणी श्रद्धा म्हणो किंवा अंधश्रद्धा,मात्र संस्थान काळापासून सुरु असलेली हि परंपरा आज २१ व्या शतकातही सांगलीकर मोठ्या उत्साहात जोपासता आहेत.

Read More