Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मुंबई - पुणे एक्स्प्रेसवर मोठा विचित्र अपघात, 4 जण जागीच ठार

Mumbai-Pune Express Accident  : मुंबई -  पुणे एक्स्प्रेसवर खोपोलीजवळ बोरघाटात झालेल्या अपघातात 4 जण जागीच ठार झाले. तर तिन जण गंभीर जखमी झाले आहेत.

मुंबई - पुणे एक्स्प्रेसवर मोठा विचित्र अपघात, 4 जण जागीच ठार

अलिबाग : Mumbai-Pune Express Accident  : मुंबई -  पुणे एक्स्प्रेसवर खोपोलीजवळ बोरघाटात झालेल्या अपघातात 4 जण जागीच ठार झाले. तर तिन जण गंभीर जखमी असून त्यांना एम जी एम रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघातात दोन वाहनांच्यामध्ये कारचा चुराडा झाला.  हा अपघात  आज सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या लेन वर झाला. (Big accident on Mumbai-Pune Express, 4 killed on the spot)

fallbacks

एका ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने 6 ते 7 वाहने एकमेकांना धडकली यात ट्रक आणि टेम्पोच्यामध्ये स्विफ्ट कारचा अक्षरशः चुराडा झाला. कारमधील चौघेही जागीच ठार झालेत. सर्व मृतदेह खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आले आहेत. या अपघातात 5 जण किरकोळ जखमी झाले आहेत.  

fallbacks

महामार्ग पोलीस , डेल्टा फोर्स , देवदूत यंत्रणा, अपघातग्रसतांच्या मदतीसाठी संस्थेच्या सदस्यांनी मदत कार्य वेगाने केले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली आहेत. महामार्गावरील  वाहतूक सुरळीत आहे. मुंबई कडे जाणाऱ्या एका ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्यामुळं हा अपघात झाला असावा असा अंदाज आहे. त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे.

अपघातातील मृतांची नावे 

1) गौरव खरात  (36)

2) सौरभ तुळसे (32)

3) सिद्धार्थ राजगुरू  (31 )

4) ओळख पटलेली नाही

हे सर्वजण सोलापूरचे राहणारे आहेत.

Read More