Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

साताऱ्याच्या अभिजित बिचुकलेला अटक

आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आलेल्या अभिजित बिचुकलेला सातारा पोलिसांनी अटक केली आहे. 

साताऱ्याच्या अभिजित बिचुकलेला अटक

सातारा : आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आलेल्या अभिजित बिचुकलेला सातारा पोलिसांनी अटक केली आहे. पण ही अटक त्याच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी नसून चेक बाऊंस प्रकरणातील आहे. सातारा गुन्हे अन्वेषण विभागाने अभिजितवर ही कारवाई केली आहे. बिग बॉस रिएलिटी शोमध्ये महिलांबद्दल वादग्रस्त विधानाने अभिजित चर्चेत आला. त्यानंतर माजी नगरसेविका रितु तावडे यांनी अभिजितच्या अटकेची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. अभिजित हा मुळचा साताऱ्याचा आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले देखील आपल्या भाषणात मिश्किलपणे अभिजितचा उल्लेख करत असतात. 

साताऱ्यातून मराठी बिग बॉस मध्ये गेलेल्या अभिजित बिचुकले याच्या विरोधात जिल्हा न्यायालयाचे अटक वॉरंट जारी केले होते. चेक बाऊन्स केल्याप्रकरणी हे अटक वॉरंट निघाले. सातारा पोलीस 'बिग बॉस' च्या सेट वर जाऊन अभिजित बिचुकलेंना अटक करण्यात आली आहे.

Read More