बदलापुरात आमदार किसन कथोरे यांच्या बंगल्यासमोरील मुख्य रस्त्यावर गोळीबाराची घटना घडली आहे. दोन गटातल्या वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या गोळीबारात अल्ताफ शेख हा जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलय.
अल्ताफ शेख याचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे बोलले जात आहे. दोन गटातील वादातूनच हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. बदलापूर गावात आमदारांचा निवासस्थान आहे. त्यांच्या घरासमोरूनच बोराटपाडा मुरबाडकडे रस्ता जातो. याच रस्त्यावर हा गोळीबार झाला आहे.
संबंधित घटना नेमकी का घडली? याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही. सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या घराबाहेरच अशा प्रकारचा गोळीबार झाल्याने नागरिकांमध्येच भीतीचं वातावरण आहे. यावेळी जर सामान्य व्यक्तीला दुखापत झाली असती तर त्याला जबाबदार कोण?
या सगळ्या घटनेचा पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तेथे पंचनामा केला जात आहे. या घटनेमागे कोणतं राजकारण आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.