Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Big Breaking : काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार?

Lok Sabha Election 2024 : काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. प्रिया दत्त शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.   

 Big Breaking : काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार?

Priya Dutt : अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेस पक्षाला राम राम ठोकला आहे. यानंतर आता काँग्रेसला मुंबईत आणखी एक मोठे खिंडार पडणार आहे. काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त या शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.  प्रिया दत्त कदाचित शिंदे गटाच्या शिवसेनेत सहभागी होणार असल्याची मागिती सुंत्रांकडून मिळाली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. 

मागील दिवसांपासून काँग्रेसला घर घर लागली आहे. काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांनी पक्ष सोडला आहे.  माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. काँग्रेसचे  माजी आमदार बाबा सिद्दीकी हे देखील राष्ट्रवादी अजित पवार गटात सामील झाले आहेत. तर, माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी मंत्री अमित देशमुख, धीरज देशमुख, सुरेश वरपूडकर, कुणाल पाटील, अमित झनक आणि माधवराव जवळगावकर हे आमदार देखील काँग्रेसला रामराम करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Read More