Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा, 2 वर्षाच्या शिक्षेला नाशिक सत्र न्यायालयाकडून स्थगिती

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा, 2 वर्षाच्या शिक्षेला नाशिक सत्र न्यायालयाकडून स्थगिती

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कनिष्ठ न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांना दिलेल्या दोन वर्षाच्या शिक्षेला नाशिक सत्र न्यायालयानं स्थगिती दिली आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी वाचली आहे. पाहुयात नेमकं काय प्रकरण आहे.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा 

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तुकाराम दिघोळे यांच्या मुलीची याचिका नाशिक सत्र न्यायालयानं फेटाळली आहे. तसेच माणिकराव कोकाटे यांच्या 2 वर्षाच्या शिक्षेला देखील न्यायालयाने स्थगिती देली आहे. माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात दाखल केलेली याचिका सत्र न्यायालयाने फेटाळली आहे. याचिकेवर रीट याचिका क्रमांक आणि अर्जदाराची स्वाक्षरी नसल्यानं अंजली दिघोळे यांची हस्तक्षेप याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. सदनिका घोटाळाप्रकरणी माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.  ते प्रकरण काय आहे पाहुयात.

सदनिका घोटाळा प्रकरण काय?

1995 मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात मिळणाऱ्या सदनिकांच्या कागदपत्रात फेरफार आणि फसवणूक केल्याचा माणिकराव कोकाटे यांच्यावर आरोप. याप्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. याबाबतचा गुन्हा नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला होता. हे प्रकरण 1997 पासून सुरु होतं. यामध्ये एकूण चार आरोपींना दाखवण्यात आलेलं होते. त्यामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूसह इतर दोघांचा समावेश होता. दरम्यान या प्रकरणी कोर्टानं 20 फेब्रुवारी रोजी निकाल देऊन माणिकराव कोकाटे यांना  2 वर्षाची शिक्षा सुनावली होती. 

दरम्यान आता नाशिकच्या सत्र न्यायालयानं तुकाराम दिघोळे यांची याचिका फेटाळत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी ही तूर्तास वाचली आहे.

Read More