Mumbai-Pune Expressway Latest Update: मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच मुंबई-पुणे एक्सप्रेसवे दहा पदरी होणार आहे. एक्सप्रेसवेवरील वाहन संख्या वाढल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. लवकरच MSRDC सरकारला प्रस्ताव पाठवणार आहे. दोन्ही बाजूंनी प्रत्येकी दोन मार्गिका वाढवल्या जाणार असल्याने मुंबई-पुणे प्रवास अधिक वेगवान होणार आहे.
मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे सध्या सहा पदरी आहे. लवकरच तो दहा पदरी करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी एकूण 14 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याआधी MSRDCने वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 8 पदरीकरण करण्याचा निर्णय घेत त्यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला होता. आता आठऐवजी थेट दहा पदरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दहा दिवसांत यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.
सध्या या महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे सहा पदरी महामार्ग अपुरा पडू लागला आहे. त्यामुळं MSRDCने प्रत्येकी दोन मार्गिका वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मुंबईपासून पुणेपर्यंतच्या 96 किमी लांब अंतराच्या या महामार्गावर अनेक वेळा वाहतूक कोंडी दिसून येते. सोमवार ते शुक्रवार या काळात दररोज सरासरी 65 हजार पेक्षा जास्त वाहने धावतात. मात्र शनिवार-रविवारी ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. जवळपास 1 लाखापेक्षा जास्त गाड्या या मार्गावर असतात. या वाढत्या वाहतूककोंडीला तोंड देण्यासाठी हा पर्याय शोधण्यात आला आहे.
नाशिक ते मुंबई दरम्यान इगतपुरी ते आमने हा समृद्धी महामार्ग आता पर्यटनाचे केंद्र बनला आहे आजूबाजूचा निसर्ग आणि धरणे पाहण्यासाठी रस्त्यावर पर्यटक थांबून सेल्फीचा आनंद घेतायत रस्त्यावर अनेक ठिकाणी कुटुंब पर्यटनाच्या या नवीन महामार्गावर जागोजागी उभे दिसून येत आहेत