Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

ठाणे जिल्ह्यात खड्याचा आणखी एक बळी, प्रशासनाच्या गैरकारभारामुळे बाईकस्वार जीवाला मुकला

ठाणे जिल्ह्यात खड्ड्याने या पावसाळ्यातील दुसरा बळी घेतला आहे. खड्ड्यामुळे एका तरुणाला आपल्या जीवाला मुकावं लागलं आहे.

ठाणे जिल्ह्यात खड्याचा आणखी एक बळी, प्रशासनाच्या गैरकारभारामुळे बाईकस्वार जीवाला मुकला

ठाणे : जिल्ह्यात खड्ड्याने या पावसाळ्यातील दुसरा बळी घेतला आहे. खड्ड्यामुळे एका तरुणाला आपल्या जीवाला मुकावं लागलं आहे. काही दिवसांपूर्वी बाईकस्वाराचा खड्ड्यामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा खड्ड्यामुळे मृत्यू झाल्याचं कानावर येता कामा नये, अशी सक्त ताकीद दिली होती. मात्र यानंतरही आता दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना ही मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात घडली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताकीदेला गांभीर्याने घेत नाहीयेत का, असा सवाला या निमित्ताने उपस्थित झाला आहे. (bike rider dies after falling into pothole on kalyan badlapur pipe line road)

नक्की काय घडलं?

पावसामुळे सध्या सर्वत्र रस्त्यांची चालण झाली आहे. याला महामार्गही अपवाद नाहीत. मग एमआयडीसीच्या रस्त्यांची अवस्था काय असेल, याचा विचार न केलेलाच बरा.

बाईकस्वाराचा खड्ड्यात तोल गेला. याच वेळेस मागून भरधाव वेगात बस येत होती. यामध्ये हा दुचाकीस्वार बसच्या चाकाखाली आला. यात या तरुणाचा अंत झाला. ही सर्व घटना आज (16 जुलै) सकाळी कल्याण-बदलापूर पाईप लाईन रोडवर म्हाडा प्रकल्पासमोरील रस्त्यावर घडली.

बदलापूर लाईन रोड हा एमआयडीसीच्या अखत्यारीत येतो. या पावसात खड्ड्यांमुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.  मात्र अद्याप रस्ते दुरुस्तीसाठी एम आयडीसीला मुहूर्त मिळाला नाही . या अपघात प्रकरणी मानपाडा पोलिसांनी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. अंकित थैवा असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.

Read More