Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

बर्थडे सेलिब्रेट जीवावर बेतले, स्प्रे मारल्याने झाली विषबाधा

 ४ विद्यार्थिनींना बर्थडे सेलिब्रेट करताना स्प्रे मारल्याने विषबाधा झाली

बर्थडे सेलिब्रेट जीवावर बेतले, स्प्रे मारल्याने झाली विषबाधा

सांगली : कवठेमहांकाळमधील घोरपडे प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील ४ विद्यार्थिनींना बर्थडे सेलिब्रेट करताना स्प्रे मारल्याने विषबाधा झाली. स्प्रे मारल्यानंतर मुलींना खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर या विद्यार्थिनींना तात्काळ उपचारासाठी मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

कवठेमहांकाळ मधील घोरपडे प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थांनीचा बर्थडे सेलिब्रेट करताना, स्प्रे मारल्याने चार विद्यार्थांनीना झाली विषबाधा झाली. खोखला, श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे एकच धावपळ उडाला. कवठेमहांकाळमधील घोरपडे प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील बर्थडे सेलिब्रेट सुरु होते. या मुलींना खोखला, श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आहे. शाळेतील मध्यांतर सुट्टीमध्ये एका विध्यार्थीनींचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

Read More