Ashish Shelar On Raj Thackeray MNS: मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि मंत्री आशिष शेलार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. राज ठाकरेंच्या पक्षांची तुलना आशिष शेलार यांनी थेट पहलगाममधील दहशतवाद्यांशी केली आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना आशिष शेलार यांनी ही टीका केली आहे.
"दोन भाऊ एकत्र झाले छान झालं दोन कुटुंब एकत्र आले आनंद झाला. कुटुंब एकत्र आणण्यासाठी आम्ही कायम असतो. दोन पक्ष एकत्र येतील का आले का हा त्यांचा प्रश्न आहे. दोन पक्ष त्यांची भूमिका घ्यायला तयार आहेत," असं आशिष शेलार म्हणाले. "कालचा कार्यक्रम आणि मराठी भाषा, त्यात झालेली भाषणं हा एक संपूर्ण इव्हेंट होता. एकचं भाषण अपूर्ण, अप्रसंगिक आणि अवास्तव असा हा कार्यक्रम होता," असा टोला शेलार यांनी लगावला आहे.
"विपर्यास करणारे कालच मुद्दे होते. त्रिभाषा सुत्री कोणी आणली, याबदल माहिती दिली ती चुकीची. देशात अन्य कुठली भाषा आहे. हे गुगल करा. दुसऱ्याचं भाषण अप्रसंगिक होतं. मूळ विषय सोडून भाषण केलं. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात सत्ता गेल्याचं दुःख दिसून आलं. म महापालिका यांच्या भाषणात काल दिसून आलं. ज्यांच्याकडे बोलायचे मुद्दे नसतात ते विपर्यास करतात," असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अनाजी पंत असा उल्लेख केल्याच्या मुद्द्यावरुन आशिष शेलार यांनी संताप व्यक्त केला आहे. "अनाजी पंत म्हणजे काय... तुम्हाला नावं ठेवायची का आम्ही? राजकीय संस्कृती पळाली पाहिजे हा महाराष्ट्र धर्म आहे. जातीवाचक बोलणं, टोमणे मारणं हेच त्यांना जमतं. दोघांच्या ही भाषणात तकलादूपणा होता, अप्रामाणिकपणा होता. प्रामाणिक असते तर देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानायला लागले असतं. दुसरा शासन निर्णय मागे देवेंद्र फडणवीस यांनी घेतला तर अभिनंदन का नाही करत?" असा सवाल आशिष शेलारांनी विचारला आहे.
"मराठी भाषेचा दर्जा हा निर्णय केला तेव्हा या दोघांची तोंड बंदी होती. का अभिनंदन तेव्हा केलं नाही? भाषेच्या विषयाशी घेणं देणं नाही. आम्ही हिंदीला विरोध नाही केला. अडवाणीजी यांनी परवानगी दिली नाही. तुमची लेकरं त्या शाळेत शिकतील तिथे तीन भाषा शिकली आहेत. हिंदुत्व अडवाणीजींनी सोडलेलं नाही. बॉम्बे स्कॉटीशमध्ये शिकताना मुंबई का नको? नाव बदलण्यासाठी त्यांनी आंदोलन का नाही केलं?" असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला.
दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं तसं यांनी भाषा विचारुन मारलं असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. "पहलगाममध्ये त्या लोकांनी धर्म विचारुन हिंदूंना गोळ्या मारल्या. इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारुन चोपतायत. दोन्ही गोष्टी उद्विग्न करणाऱ्या आहेत. व्हिडीओ काढा अथवा नका काढू पण हिंदूंना चोपण्यामध्ये तुम्हाला जो आनंद मिळतोय ना हा अख्खा महाराष्ट्र पाहतोय," असं शेलार म्हणाले.
"सरकारने पावलं उचलावी. मोठा भाऊ आहोत म्हणून मर्यादा सांभाळून आहोत," असं सूचक विधानही आशिष शेलार यांनी केलं आहे.