Sanjay Raut on Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशानंतर संजय राऊतांनी बडगुजर यांच्यासह भाजपवर टीका केलीय. भाजप हा भ्रष्ट आणि देशद्रोही पक्ष असल्याचा निशाणा त्यांनी साधला. तर ठाकरेंच्या शिवसेनेला टीका करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचं बडगुजरांनी म्हटलंय. ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा टीका केल्यास शिंगावर घेणार असा इशारा बडगुजरांनी दिलाय.
सुधाकर बडगुजरांसह संजय राऊतांनी पुन्हा एकदा भाजपवर शरसंधान साधलंय. भाजपनं सलीम कुत्तावरून सुधाकर बडगुजरांविरोधात रान पेटवलं होतं. दरम्यान त्याच बडगुजरांना भाजपात प्रवेश दिल्याचं म्हणत राऊतांनी भाजपला धारेवर धरलं. भाजपनं सलीम कुत्ताला तुरूंगातून आणून पक्षात घेतल्याचा टोला देखील त्यांनी लगावला आहे. दरम्यान माझ्यावर टीका करण्याचा उबाठाला कोणताही अधिकार नसल्याचं म्हणत बडगुजरांनी ठाकरेंची शिवसेनेला प्रत्युत्तर दिलंय.
एवढंच नव्हे तर भाजप भ्रष्ट आणि देशद्रोही पक्ष आहे. सर्व भ्रष्टाचारी लोक भाजपनं घेतल्याची सडकून टीका संजय राऊतांनी केलीय. तर पक्षात येणा-यांचं आम्ही स्वागत करतो. त्यांचा जुना इतिहास काय आहे. तो सर्व बाजूला ठेवून भाजपच्या निती नियमांनी त्यांनी वागलं पाहिजे असं मत बडगुजरांच्या पक्षप्रवेशावर फडणवीसांनी व्यक्त केलंय. संजय राऊत पुढे म्हणाले की, शरद पवार योग्य तेच बोलले आहे. मी वारंवार तेच सांगत होतो की, शरद पवार अशा प्रकारच्या कोणत्याही प्रवृत्तींना जवळ करणार नाहीत. शाहू-फुले-आंबेडकर हा जसा राज्याचा विचार आहे, त्या विचारांबरोबर बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र एकसंघ ठेवण्याचा आणि महाराष्ट्राच्या शत्रूशी रडण्याचा लढण्याचा विचार आहे. त्यात आम्ही तडजोड करणार नाही. हे संधीसाधू आमच्याकडून एखाद्या पार्टीत गेले असतील. आम्ही त्यांचा विचार देखील करत नाही. पण, त्यांना असेच लोक लागतात. भ्रष्ट, गुंड, दाऊदचे हस्तक असे लोक त्यांना लागतात. भारतीय जनता पक्षाने सलीम कुत्ता याला संत म्हणून पदवी दिली पाहिजे. कारण ज्या व्यक्तीला त्यांनी सोबत घेतले आहे ते शिवसेनेत असताना भाजपने सलीम कुत्ता सोबत संबंध जोडून आमच्या पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असेही त्यांनी म्हटलं.
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू असतानाच त्यांना सीमा हिरेंनी विरोध केला होता. कारण बडगुजर हे सीमा हिरेंचे कट्टर विरोधक आहेत. त्यांनी हिरेंविरोधात निवडणूक देखील लढवली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून बडगुजरांना मोठा विरोध होता. मात्र बडगुजरांना विरोध करणा-या नेत्यांची समजूत काढल्याचंही भाजपनं
म्हटलंय.
आगामी पालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरूय. सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान त्यांच्यासोबत काही माजी नगरसेवक देखील भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे याचा नाशिक महानगरपालिकेत भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे तर ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का
समजला जातोय.