Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

प्रशांत बंब चौकशीची भीती दाखवून ब्लॅकमेलिंग करतात; भाजपा आमदाराचा आरोप

बंब केवळ चौकशी लावतात आणि ब्लॅकमेलिंग करतात.

प्रशांत बंब चौकशीची भीती दाखवून ब्लॅकमेलिंग करतात; भाजपा आमदाराचा आरोप

शिवसेनेपाठोपाठ आता स्वपक्षीय भाजपच्या आमदारांनीही आमदार प्रशांत बंब यांच्यावर ब्लॅकमेलिंगचे आरोप केले आहेत. बंब केवळ चौकशी लावतात आणि ब्लॅकमेलिंग करतात, असा आरोप आमदार मोहन फड यांनी बंब यांच्यावर केलाय. प्रशांत बंब यांनी भ्रष्टाचार बाहेर काढावा. मात्र, वारंवार केलेल्या तक्रारींमुळे अधिकारी काम करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. औरंगाबादेतील शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनीही प्रशांत बंब यांच्यावर आरोप केले आहेत. 

Read More