Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'काँग्रेस फोडा आणि रिकामी करा', चंद्रशेखर बावनकुळेंच्या कानमंत्राने खळबळ; शिवसेना, राष्ट्रवादीनंतर काँग्रेसमध्ये फूट पडणार?

काँग्रेस फोडा आणि रिकामी करा या बावनकुळेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात सध्या खळबळ उडाली आहे.    

'काँग्रेस फोडा आणि रिकामी करा', चंद्रशेखर बावनकुळेंच्या कानमंत्राने खळबळ; शिवसेना, राष्ट्रवादीनंतर काँग्रेसमध्ये फूट पडणार?

काँग्रेस फोडा आणि रिकामी करा या बावनकुळेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात सध्या खळबळ उडाली आहे.  कार्यकर्ता मेळाव्यात चंद्रशेखर बावनकुळेंनी थेट कार्यकर्त्यांना सूचनाच दिल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये येत्या काळात काही मोठा आऊटगोईंग बघायला मिळणार का याकडे लक्ष लागलं आहे.

गेल्या 2 वर्षात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर संपूर्ण राजकारण ढवळून निघालं होतं. आता पुन्हा एकदा राज्यात पक्षफुटीचं वारं वाहणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आणि याला कारण ठरलं आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेलं विधान. काँग्रेसला फोडा आणि पक्ष रिकामा करा असा कानमंत्रच चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजप पदाधिका-यांना दिला आहे. पुण्यातील भाजप कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बावनकुळेंनी केलेल्या या विधानानं खळबळ उडाली आहे.

काही दिवसापूर्वीच काँग्रेसच्या संग्राम जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून भाजपने काँग्रेसला अनेक धक्के दिले आहेत. त्यात आता भाजपने काँग्रेसच रिकामी करण्याचं वक्तव्य केल्याने काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. महाविकास आघीडीतील शिवसेना UBT आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानेही भाजपवर जोरदार टीका केली आहे.

तर दुस-य़ांचं घर फोडून स्वत:च घर चालत नाही असा सल्ला रासपच्या महादेव जानकरांनी भाजपला दिला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीनंही बावनकुळेंच्या विधानाला पाठिंबा दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षांमधील नेतेमंडळींमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचा टोला प्रताप सरनाईकांनी लगावला आहे. 

गेल्या काही दिवसात अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा हात सोडून हातात कमळ घेतलं आहे. त्यामुळे पक्षगळतीमुळे आधीच टेन्शनमध्ये असणारी काँग्रेस आणखीनच टेन्शनमध्ये येणार आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक तोंडावर असताना बावनकुळेंनी पदाधिका-यांना दिलेल्या या सूचनेमुळे येत्या काळात काय परिणाम दिसणार याकडे लक्ष लागलंय.

Read More