Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

भाजपच्या नेत्या शालू शिंदेंची गळफास घेऊन आत्महत्या

जिल्ह्यातील घुग्गुस शहरातील भाजपच्या नेत्या आणि पंचायत समिती  सदस्या शालू शिंदे यांनी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

भाजपच्या नेत्या शालू शिंदेंची गळफास घेऊन आत्महत्या

चंद्रपूर : जिल्ह्यातील घुग्गुस शहरातील भाजपच्या नेत्या आणि पंचायत समिती  सदस्या शालू शिंदे यांनी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

शिंदे पंचायत समिती सदस्य

काही महिन्यांपूर्वीच पंचायत समितीची निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत शालू विवेक शिंदे घुग्घुस मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. त्यांचे वॉर्ड क्रमांक ६  येथे घर आहे. शालू शिंदे  यांचा ब्युटीपॉर्लरचाही व्यवसाय होता. 

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

त्यांनी घरातच गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. भाजपच्या अनेक पदाधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली. शालू यांचे पती चंद्रपुरातील एका महाविद्यालयात लिपिक पदावर कार्यरत आहेत. आत्महत्येचे कारण अजूनही स्पष्ट झाले नाही.

Read More