राज ठाकरेंनी कुंभमेळा आणि गंगा नदीच्या प्रदूषणाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला आहे. भाजपनं राज ठाकरेंवर टीका केली आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षातील काही नेत्यांनी त्यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुंभमेळा आणि गंगा प्रदूषणावर भाष्य केल्यानंतर भाजपनं त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी मात्र, त्यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्य योग्य असल्याचं म्हटलं आहे.
एकीकडे जितेंद्र आव्हाड हे राज ठाकरेंच्या वक्तव्याचं समर्थन करतात मात्र, दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे नेते रोहित पवारांनी नदी प्रदूषणावर बोलले ते योग्यच, पण कोणाच्या भावना दुखावतील असं वक्तव्य करु नये असं म्हटलं आहे. तर दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनीही राज ठाकरेंच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. देशातील नद्या स्वच्छ झाल्या पाहिजेत असं म्हणत ठाकरेंच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे.
कुंभमेळ्यासंदर्भात राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यानंतर मंत्री नितेश राणे चांगलेच आक्रमक झाले आहेत. बकरी ईद, मोहरमच्या वेळेस राज ठाकरे का बोलत नाहीत? असा सवाल उपस्थित करत त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. दरम्यान त्यांच्या टीकेनंतर मनसे नेते अविनाश
जाधव यांनी राणेंना प्रत्युत्तर दिलं आहे. नमाज आणि भोंग्याचा मुद्द्याव बोललो, राणेंना राज ठाकरेंची भाषणं पाठवतो असं ते म्हणाले आहेत.
राज ठाकरेंनी कुंभमेळ्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्या वक्तव्याचं समर्थनही केलं जात आहे. तर दुसरीकडे त्यांच्यावर टीकाही होत आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी बोलताना सावधगिरी बाळगावी असा सल्ला देखील त्यांना देण्यात येत आहे.
"आमचे बाळा नांदगावकर महाकुंभला गेले होते. ते कमंडलूमधून पाणी घेऊन आले. मी म्हटलं हड मी नाही पिणार. मी त्या सोशल मीडियावर व्हिडीओ पाहतोय तिथे आलेल्या बाया, पुरुष अंग घासतायत. आणि बाळा नांदगावकर म्हणतात साहेब हे गंगेचं पाणी घ्या, कोण पिणार ते पाणी?," अशी खिल्ली राज ठाकरेंनी वर्धापन दिन सोहळ्यात उडवली.