Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

शनिशिंगणापुरात भाविकांची फसवणूक! 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; CM फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

देवस्थानावर झालेल्या चौफेर टीकेनंतर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून देवस्थान मंडळावर कारवाईचे आदेश दिलेत  

शनिशिंगणापुरात भाविकांची फसवणूक! 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; CM फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

हल्ली माणसांची काय अहो देवाचीही फसवणूक केली जाते. शनिशिंगणापूर देवस्थानचंच पाहा, तिथे कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार करून अनेकांनी मोठी माया गोळा केली आहे. देवस्थानावर झालेल्या चौफेर टीकेनंतर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून देवस्थान मंडळावर कारवाईचे आदेश दिलेत. पाहुयात हा रिपोर्ट.

शनिशिंगणापुरात अनेक भाविक येतात आणि साडेसाती असो नसो तुझी कृपा राहो, अशी प्रार्थना करतात. मात्र याच देवस्थानाला भ्रष्टाचाराची साडेसाती लागली आहे. भाविकांची देवाच्या नावे कोट्यवधी रूपयांची फसवणूक झालीय. ऑनलाइन पद्धतीनं पूजा, बनावट अॅप, क्युआर कोड, बोगस कर्मचारी असा मिळून तब्बल 500 कोटींचा घोटाळा केल्याचे गंभीर आरोप भाजप नेते ऋषिकेश शेटेंनी केले आहेत. शनिशिंगणापूर देवस्थान भ्रष्टाचाराचा मुद्दा विधानसभेतही गाजला.

यावर विश्वस्थ मंडळ बरखास्त केलं जाईल, देवाच्या नावानं भ्रष्टाचार करणा-यांना सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. दरम्यान, माजी मंत्री शंकरराव गडाखांच्या अधिपत्याखाली शनी मंदिर ट्रस्ट सुरू होतं त्यामुळे भ्रष्टाचाराची उत्तर त्यांनाच द्यावी लागतील, असा निशाणा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी साधला आहे.  आरोप झाल्यावर गडाखांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

कायद्याचा धाक काही जणांना नसतो हे अनेकदा पाहिलंय पण आता देवाच्या दारातही लोक भ्रष्टाचार करतात, देवाचाही धाक अशांना उरलेला नाही, हेच यातून समोर आलंय.. 

Read More