विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना भाजप आमदार सुधीर मुंनगंटीवार यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. कृषी विभागाच्या एका उत्तरावर मुनगंटीवार संतापले होते. यावेळी बोलताना मी देखील चुकीने काही काळ मंत्री होतो असं ते म्हणाले. मुनगंटीवारांच्या या विधानावरून सभागृहात जोरदार टोलेबाजी रंगल्याचं पाहायला मिळालं.
भाजपने मंत्रिपद डावललेले आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत बोलताना आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानसभेत बोलताना माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बोलताना मी ही चुकून मंत्री होतो असं विधान केलं. यावरून विधानसभेतील सदस्यांनी टोलेबाजी केली. मात्र या विधानामुळे बोलता बोलता मुनगंटीवार यांनी आपल्या मनातील खदखदच बोलून दाखवली आहे. 2014 ते 2019 आणि त्यानंतर 2022 ते 2024 पर्यंत मुनगंटीवार मंत्री होते. मात्र 2024 च्या निवडणुकीनंतर त्यांना वगळण्यात आल्यानं ते नाराज आहेत.
सुधीर मुनगंटीवारांच्या चुकून मंत्री झालो या विधानानंतर मंत्री आशिष शेलार ही या चर्चेत सामील झाले. सुधीरभाऊ चुकून नाही तर ते जनतेने ठरवून मंत्री होते असं आशिष शेलारांनी म्हटलं आहे. त्यामुळे चुकून मंत्री होते हे विधान रेकॉर्डवरून काढण्याची मागणी शेलार यांनी केली.
आता भाजपच्याच दोन दिग्गजांमध्ये ही टोलेबाजी सुरू झाल्यानंतर काँग्रेस आमदार नाना पटोले यांनीही यात उडी घेत सत्ताधाऱ्यांना टोला लगावला.. तर त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाही मिश्किल उत्तर दिलं. नाना पटोले यांनी त्यांना चुकून बाहेर ठेवले गेले आहे का? अशी विचारणा केली असता, राहूल नार्वेकर यांनी मीही चर्चा चुकून घडवून आणतोय असं वाटायला नको असं म्हटलं.
मुनगंटीवार यांच्या मी ही चुकून मंत्री होतो या विधानानंतर सभागृहात जुगलबंदी रंगली खरी मात्र यातून मंत्रिपदावरून डावलल्याची खदखद मुनगंटीवार यांनी बोलून दाखवली आहे. आपल्याला डावलल्याची भावना मुनगंटीवार यांना अद्यापही सलत असल्याचं दिसत आहे.