Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

भाजपच्या या महापौरांची उचलबांगडी होणार

 भाजपच्या महापौरांची लवकरच उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. 

भाजपच्या या महापौरांची उचलबांगडी होणार

नागपूर : भाजपच्या महापौरांची लवकरच उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. नंदा जिचकार यांनी मुलासोबत केलेली अमेरिकावारी त्यांना भोवण्याची चिन्हं आहेत. महापौर नंदा जिचकार यांची मुलासोबतची अमेरिकावारी त्यांना भोवण्याची चिन्हं आहेत.  नागपुरात २७ ऑक्टोबरला होणा-या  महापौर परिषदेनंतर महापौर नंदा जिचकार यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार असल्याचे संकेत भाजप नेत्यांनी दिले आहेत. महापौर नंदा जिचकार यांनी अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्कोमध्ये झालेल्या एका परिषदेला मुलाला पीए म्हणून सोबत नेलं होतं.  

याप्रकरणी काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही महापौरांना बोलावून त्यांच्या मुलासोबतच्या अमेरिकावारीसंदर्भात स्पष्टीकरण मागितलं होतं. महापौर अमेरिकेहून परतताच  पक्षाकडून त्यांचा राजीनामा घेण्यात येणार होता. पण विरोधकांना याचं श्रेय मिळू नये म्हणून ही अंमलबजावणी थांबवण्यात आल्याची चर्चा आहे. आता २७ ऑक्टोबरच्या महापौर परिषदेनंतर महापौर आणि उपमहापौर दोन्ही बदलण्याची शक्यता आहे. 

Read More