Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

अपहरण, मारहाण अन् नंतर रोहित पवारांना VIDEO कॉल; गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याने सांगितला घटनाक्रम

Gopichand Padalkar Supporter Kidnapped: सोलापुरात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे फिल्मी स्टाईल अपहरण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी अपहरण करुन हत्येचा प्रयत्न केल्याची माहितीही समोर आली आहे  

अपहरण, मारहाण अन् नंतर रोहित पवारांना VIDEO कॉल; गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याने सांगितला घटनाक्रम

Gopichand Padalkar Supporter Kidnapped: सोलापुरात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे फिल्मी स्टाईल अपहरण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी अपहरण करुन हत्येचा प्रयत्न केल्याची माहितीही समोर आली आहे. शरणु हांडे  असे अपहरण झालेल्या गोपीचंद पडळकर समर्थकाचे नाव आहेत. तर अमित सुरवसे असे अपहरण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. सुरवसे हा आमदार रोहित पवारांचा कार्यकर्ता असून, त्यांच्या सांगण्यावरुनच हे अपहरण झाल्याचा आरोप त्याने केला आहे. 

सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांचा वाद टोकाला गेला आहे आ. गोपीचंद पडळकर यांचे समर्थक शरणू हांडेचे अपहरण करून धारदार शस्त्राने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून शरणू हांडे याचे अपहरण करून कर्नाटकात नेऊन मारहाण केल्याचा प्रकार घडला. सोलापुरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चारपेक्षा अधिक लोकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरु होती. 

शरणु हांडे याने 'झी 24 तास'शी संवाद साधताना सांगितलं की, "अमित सुरवसे आणि त्याचे सहा साथीदार मला घरापासून मारहाण करत घेऊन गेले. जात असताना अमित सुरवसे याने रोहित पवारांच्या एका निकटवर्तीयाला फोन केला. रोहितदादांना अर्जंट कॉल आहे, त्यांना मला व्हिडीओ कॉल करायला सांगा असं सांगितलं. त्यानंतर रोहित पवारांचा फोन आला. फोन आल्यानंतर रोहित पवारांना मला झालेली मारहाण दाखवण्यात आली. त्यानंतर त्यांच्यासमोर आणखी दोन मारले. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कसे असतात पाहिलं का बोलले. यानंतर रोहित पवारांनी मला अमितची माफी मागायला सांगितलं. माफी मागितल्यानंतर सोडून देऊ असं म्हणाले. मी माफी कशाला मागू म्हटल्यानंतर रोहित पवारांनी अमितला त्याला मस्ती आहे सांगत फोन कट केला". पोलिसांनी मला वाचवून पुनर्जन्म दिल्याबद्दल आभार मानतो. कठोर कारवाई करुन न्याय द्यावा अशी विनंतीही त्याने केली आहे. 

चारजण ताब्यात

रोहित पवार यांचे कार्यकर्ते अमित सुरवसे यांच्यासह अन्य लोकांनी अपहरण करून मारहाण केल्याचा आरोप आहे. अक्कलकोट रोड येथील मल्लिकार्जुन नगर परिसरातून शरणू हांडे यांचे अपहरण केल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी चारपेक्षा अधिक जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहित आहे. शरणू हांडे यांच्यावर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुर आहे. 

पडळकर-पवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये जुना संघर्ष

गोपीचंद पडळकर आणि रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चार वर्षापासून राजकीय संघर्ष सुरु आहे. 2021 साली सोलापुरातील शासकीय विश्रामगृह येथे अमित सुरवसे यांनी त्यांच्या समर्थकांसह गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक केली होती. त्यानंतर शरणू हांडे यांनी त्याच्या समर्थकांसह 2021 साली राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केली होती.  सहा महिन्यापूर्वी शरणू हांडे यांनी अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याच संघर्षातून अमित सुरवसे सह त्याच्या इतर साथीदारांनी शरणु हांडे याचे अपहरण करून मारहाण केल्याची चर्चा आहे. 

Read More