Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम

 भाजप आमदार नितेश राणे यांच्यावरील अटकेची टांगती तलवार अद्याप कायम आहे. 

आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम

सिंधुदुर्ग :  MLA Nitesh Rane News : भाजप आमदार नितेश राणे यांच्यावरील अटकेची टांगती तलवार अद्याप कायम आहे. नितेश राणे यांच्यावतीने दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज देखील सुनावणी होणार आहे. (BJP MLA Nitesh Rane likely to be arrested)

काल नितेश राणे यांच्या वकिलांनी अटकपूर्व जामिनासाठी युक्तिवाद केल्यानंतर सरकारी वकिलांनी युक्तिवाद करत राणे यांच्या वकिलांचे अनेक मुद्दे खोडून काढले. आजही सरकारी पक्षातर्फे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात युक्तिवाद केला जाणार आहे.

या युक्तिवादानंतर नितेश राणे यांचे वकील पुन्हा सरकारी वकिलांचे मुद्दे खोडुन काढू शकतात. सकाळी 11 नंतर नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर कधीही सुनावणी होवू शकते. दरम्यान न्यायालयाने संशयित आरोपीना अंतरिम अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आहे, असे विशेष  सरकारी  वकिलांनी सांगितले आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. 

Read More