Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पीक विमा घोटाळ्याचा आका कोण? आमदार सुरेश धसांनी पीकविमा योजनेतील घोटाळ्यावरून केले गंभीर आरोप

सुरेश धस यांनी कृषी विभागातील अधिका-याचं नाव घेऊन घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. सुरेश धस यांनी आता सरकारलाच घरचा आहेर दिलाय.

पीक विमा घोटाळ्याचा आका कोण? आमदार सुरेश धसांनी पीकविमा योजनेतील घोटाळ्यावरून केले गंभीर आरोप

Crop insurance scam : भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पीकविमा योजनेतील घोटाळ्यावरून गंभीर आरोप केलेत. धस यांनी कृषी विभागातील अधिका-याचं नाव घेऊन घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. सुरेश धस यांनी आता सरकारलाच घरचा आहेर दिलाय.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सत्ताधारी पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली. धस यांच्या भूमिकेनंतर धनंजय मुंडेंना मंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. आता सुरेश धस यांनी आपला मोर्चा राज्यातील कृषी विभागाकडे वळवलाय. भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी अधिका-यांवर तोफ डागली आहे. कृषी संचालक विनय आवटेंचं नाव घेत पंतप्रधान पीक विमा योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप धस यांनी केलाय. आवटेंशिवाय विश्वासू माणूस सरकारला सापडला नाही असं म्हणत धसांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. 

कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या स्वतःच्या बायकोच्या आणि मुलाच्या नावावर 78 कंपन्या असल्याची माहिती समोर आली आहे. विनय आवटे नावाचा कृषी सांख्यिकी अधिकारी 20 वर्षांपासून या विभागात कार्यरत आहे.

हेही वाचा : Awhad vs Padalkar Clash: विधीमंडळातील हाणामारीवर CM फडणवीसांनी एका प्रश्नात दिलं उत्तर, म्हणाले 'मी विनंती...'

 

कोण आहेत विनय आवटे?

कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी
विस्तार आणि प्रशिक्षण विभागाचे विद्यमान संचालक
जून 2024पासून विस्तार आणि प्रशिक्षण विभागाचे संचालक
आधी जिल्हा परिषदेत कृषी विकास अधिकारी
शेतकरी मासिकाच्या संपादकपदाचा अनुभव

शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी यावरून देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय. मुख्यमंत्री सक्षम असल्याचा टोला खासदार राऊतांनी लगावला आहे. एका सत्ताधारी पक्षाच्या आमदारानंच कृषी विभागातील गैरव्यवहारावर बोट ठेवलंय. त्यामुळे हे प्रकरण गंभीर असून धस यांनी त्यांच्याकडचे पुरावे मुख्यमंत्र्यांना द्यावे, असं आवाहन राष्ट्रवादीचे आमदारअमोल मिटकरी यांनी केलंय. हा घोटाळा कोट्यवधी रुपयांचा असून यात अनेक कंपन्यांचा समावेश आहे. कृषी विभागातील या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांच्या हितावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे आमदार धस यांनी केलेल्या आरोपांनंतर आता चौकशी होणार का, याकडे लक्ष लागलंय.

Read More