Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

जळगाव महापालिकेसाठी भाजप-शिवसेनेची युती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जळगाव महापालिकेत भाजप शिवसेना युतीबाबत हिरवा कंदील दिला 

जळगाव महापालिकेसाठी भाजप-शिवसेनेची युती

जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जळगाव महापालिकेत भाजप शिवसेना युतीबाबत हिरवा कंदील दिला असल्याची माहिती, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. मात्र महापालिकेच्या ७५ जागांपैकी कोणी किती जागा लढवायच्या याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर होणार आहे. त्यामुळे येत्या एक दोन दिवसांत जागावाटपाचा तिढा सुटेल असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केलाय. दरम्यान जळगाव महापालिका निवडणुकीतल्या उमेदवारीसाठी जळगाव भाजप कार्यलयात इच्छुक उमेदवारांची अक्षरशः जत्रा भरली होती. ७५ जागांसाठीच्या १९ प्रभागांमधून सुमारे अडीचशे इच्छुकांचे अर्ज भाजपला मिळाले आहेत. 

Read More