Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'त्या' रात्री धनंजय मुंडे कुठे होते ?

सुधीर सुर्यवंशी यांनी त्यांच्या पुस्तकात हा खुलासा केला

'त्या' रात्री धनंजय मुंडे कुठे होते ?

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फसवलेला शपथविधी साऱ्या राज्याने पाहीला. पण यासाठी आमदारांची जुळवाजुळव नेमकी कशी होत होती ? हे कोणताही नेता खुलेपणाने बोलत नाही. पत्रकार सुधीर सुर्यवंधी यांच्या 'हाऊ द बीजेपी वॉन एण्ड लॉस्ट महाराष्ट्र' या पुस्तकात हे किस्से त्यांनी लिहीले आहेत. भाजपकडून राष्ट्रवादीच्या आमदारांची पळवापळवी सुरु असताना आमदार धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर हे आमदार भेटले होते. त्यामुळे मुंडेंच्या भुमिकेकडे साऱ्यांचं लक्ष होतं. त्यावेळी माझ्या बंगल्यावर सर्वच नेत येजा करत असतात असा खुलासा मुंडेंनी केला होता. मग 'त्या' रात्री मुंडे कुठे होते हा प्रश्न अनुत्तरीत राहतोच. सुर्यवंशी यांनी त्यांच्या पुस्तकात हा खुलासा केला आहे. 

कॉंग्रसच्या अवास्तवी मागण्यांना अजित पवार कंटाळले होते. त्यांनी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर ३८ आमदारांना बोलावून घेतले. रात्री १ च्या सुमारास शरद पवारांपर्यंत ही बातमी पोहोचली. त्यांनी सर्व माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी १५ आमदार अजित पवारांसोबत असल्याचे शरद पवारांना कळाले.

fallbacks

१५ आमदारांवर सरकार स्थापन करता येणार नाही हे पवारांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी विश्वासातील आमदारांना फोनाफोनी करण्यास सुरुवात केली. आणि परतण्याचे आवाहन केले. 

दरम्यान शरद पवारांना उचलल्याशिवाय असे पाऊल उचलू नये अशी विनंती सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडे यांनी अजित पवारांना केली होती. पण अजित पवारांनी कोणाचं ऐकून घेतलं नाही. कोणत्या बाजुला जावं ? कोणाचा रोष ओढावून घ्यावा या मोठ्या पेचात धनंजय मुंडे पडले. याला विरोधही नको आणि समर्थनही नको अशी भूमिका त्यांनी घेतली आणि जवळचे मित्र असलेल्या तेजस ठक्करच्या घरी गेले. धनंजय मुंडे हे रात्रभर तेजस ठक्कर यांच्या फ्लॅटवर राहीले. कोणालाच याबद्दल कल्पना नव्हती. 

शरद पवारांनी धनंजय मुंडेंना फोन लावला पण काही संपर्क झाला नाही. दुसरीकडे धनंजय मुंडे हे शपथविधीमध्ये देखील दिसले नाहीत. मग मुंडे गेले कुठे ? असा प्रश्न उपस्थित झाला. हे सुरु असताना भाजपने राष्ट्रवादीच्या आमदारांची हरियाणातील एका हॉटेलमध्ये केली होती. त्यांना घेऊन जाण्यासाठी विमानतळावर ७ खासगी विमानं देखील सज्ज होती. 

मुंडेशी संपर्क न झाल्याने शरद पवारांनी तेजस ठक्कर यांना फोन लावला. रात्री घरी नसलेल्या ठक्कर यांनी सकाळी आपला फ्लॅट गाठला. त्यांना फ्लॅट आतून बंद असलेला दिसला. त्यानंतर त्यांनी दरवाजा तोडण्याचा निर्णय केला.

fallbacks

सोसायटीच्या नियमांच्या विरोधात जाऊन ठक्कर यांनी स्वत:च्या घरचा दरवाजा तोडला. तेव्हा धनंजय मुंडे त्यांना आत झोपलेले दिसले. धनंजय मुंडे यांच्या फोनवर शंभरहून अधिक मिस कॉल होते. 

fallbacks

धनंजय मुंडेंचा शरद पवारांशी संपर्क झाला. त्यानंतर काहीवेळाने संजय राऊत यांनी धनंजय मुंडे थोड्या वेळात येतील असे जाहीर केले. 

असे अनेक किस्से सुधीर सुर्यवंशी यांनी आपल्या पुस्तकात लिहीले आहेत. 

Read More