Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मावळमध्ये भाजपच्या बालेकिल्ल्याला महाविकासआघाडीचा सुरुंग

 57 पैकी 45 ग्रामपंचायतीवर विजय

मावळमध्ये भाजपच्या बालेकिल्ल्याला महाविकासआघाडीचा सुरुंग

मावळ : 57 पैकी 45 ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने विजय मिळवत सत्ता काबिज केली आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या मावळ मधील ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व राखलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर मावळ तालुक्यात भाजपला पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील शेळके यांनी धक्का दिला आहे. एकूण 57 ग्रामपंचायती पैकी 45 ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने निर्विवाद सत्ता मिळवली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत मावळमध्ये भाजपचा बालेकिल्ला हा महाविकास आघाडीने उधळून लावला आहे. सुनील शेळके हे राष्ट्रवादीचे आमदार झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे सर्वांचेच लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिले होते. आमदार सुनील शेळके यांनी हा विजय मावळ मधील जनतेला समर्पित केला आहे.

राज्यातील ग्रामपंचायतींचा निकाल

 

Read More