Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

गडचिरोलीः महिला कामगारांना घेऊन जाणारी बोट वैनगंगा नदीपात्रात उलटली; एका महिलेचा मृत्यू, 5 बेपत्ता

Gadchiroli News: महिला मिरची तोडण्याकरीता चंद्रपूर जिल्ह्यात नावेतून निघाल्या होत्या मात्र त्याचवेळी त्यांची नाव पाण्यात उलटली. यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. 

गडचिरोलीः महिला कामगारांना घेऊन जाणारी बोट वैनगंगा नदीपात्रात उलटली; एका महिलेचा मृत्यू, 5 बेपत्ता

Gadchiroli News: गडचिरोली जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मिरची तोडणीसाठी मजुरांना घेऊन जाणारी नाव उलटल्याने सात महिला बुडाल्या आहेत. मंगळवारी 11 वाजताच्या सुमारास ही घटना चामोर्शी तालुक्यातील गणपूरलगत वाहणाऱ्या वैनगंगा नदीत घडली आहे. एका महिलेचा मृतदेह आढळून आला असून पाच महिलांचा अद्यापही शोध लागलेला नाही. 

गणपूर रै परिसरातील महिला चंद्रपूर जिल्ह्यातील मिरची तोडणीसाठी जात होत्या. 23 जानेवारीला सकाळी नेहमीप्रमाणे सहा महिलांना घेऊन नाव जात होती. मात्र, ऐन मध्यात येताच नाव नदीपात्रात उलटली. त्यामुळं सहाही महिला पाण्यात बुडाल्या आहेत. या घटनेत एका महिलेचा मृतदेह सापडला असून अद्याप 5 महिला बेपत्ता आहेत. तर एका महिलेला वाचविण्यात आले आहे. 

या घटनेत गणपूर (रै.) येथील पोलीस पाटलाची पत्नीसुध्दा वाहून गेल्याची माहिती प्राप्त होत आहे. या महिला मिरची तोडण्याकरीता चंद्रपूर जिल्ह्यात नावेच्या सहाय्याने जात होत्या. अचानक पाण्यात नाव वाहून गेल्यामुळे सात महिला आणि नावाडी बुडाले आहेत. मात्र नावाड्याला पोहोता येत असल्याने तो पोहोत किनाऱ्यावर आले. तसंच, एका महिलेला वाचविण्यात आले. परंतू सहा महिला बुडाल्या असून यापैकी एका महिलेचा मृतदेह सापडला असून पाच महिलांचा शोध घेतला जात आहे. चामोर्शी पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. शोधमोहीम वेगात सुरू आहे.

Read More