Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

अकोल्यात बॉक्सर प्रणव राऊतची आत्महत्या

राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रणव राऊतने महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करत सुवर्ण पदक मिळवलं होतं.

अकोल्यात बॉक्सर प्रणव राऊतची आत्महत्या

अकोला : अकोल्यातील शास्त्रीय स्टेडिअम जवळील क्रीडा प्रबोधिनी छात्रवासामध्ये एका बॉक्सरने आत्महत्या केली आहे. प्रणव राऊत असं या खेळाडूचं नाव आहे. तो नागपूरचा आहे. क्रीडा प्रबोधिनीतल्या छात्रवासात त्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून, याप्रकरणी पोलिसांकडून अधिक चौकशी सरु आहे. 

शुक्रवारी सकाळी प्रणव क्रीडा प्रबोधिनीच्या त्याच्या खोलीतून बराच वेळ बाहेर आला नाही. तो बाहेर न आल्याने त्याच्या मित्रांनी दरवाजा ठोठावला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने त्याच्या मित्रांनी दरवाजा तोडला. दरवाजा तोडल्यानंतर प्रणव गळफास लावलेल्या स्थितीत असल्याचं दिसलं. प्रणव केवळ २२ वर्षांचा होता. या वयात त्याने आत्महत्या का केली असेल? याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. प्रणवच्या जाण्याने अकोल्यासह संपूर्ण राज्यातील क्रिडा क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

जानेवारीमध्ये झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रणव राऊतने महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करत सुवर्ण पदक मिळवलं होतं. दरम्यान, याप्रकरणी क्रिडामंत्री सुनील केदार यांनी माहिती घेतली असून, पुढील चौकशीचे आदेश त्यांनी दिले आहेत. 

  

Read More