Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

चक्क नववधू बुलेटवरुन लग्नमंडपात आली आणि...

आपल्या लग्नात चक्क नववधू बुलेटवरुन लग्नमंडपात आली.

चक्क नववधू बुलेटवरुन लग्नमंडपात आली आणि...

पुणे : आपल्या लग्नात चक्क नववधू बुलेटवरुन लग्नमंडपात आली आणि त्याची चर्चा सुरु झाली. दरम्यान, 'सैराट' सिनेमातील आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरुने जेव्हा ऑनस्क्रीन बुलेट चालवली तेव्हा तिची चांगलीच चर्चा झाली होती. आता पुणे जिल्ह्यातील नववधूनची जोरदार चर्चा आहे. केडगाव या ठिकाणी  नववधू बुलेटवरून आल्याचे पाहून सगळ्यांनाच नवल वाटले. कोमल शहाजी देशमुख हिने आपल्या बाबांशी लग्नात बुलेटवरुन जाण्याची इच्छा बोलून दाखवली. मात्र, बाप तो बाप. त्याने मुलीचा शब्द खाली पडू दिला नाही. त्यांनी लागलीच बुलेट उपलब्ध करुन दिली आणि कोमल नववधू स्वत: बुलेट घेऊन चक्क मांडवात दाखल झाली.

कोमलच्या वडिलांनी म्हणजेच शहाजी देशमुख यांनी घरापासून लग्न मंडपापर्यंत बुलेट चालवण्याची संमती कोमलला दिली. त्यानंतर ती एकदम खूश झाली. नववधू कोमल छानपैकी नटून थटून बुलेटजवळ आली आणि गाडीची कीक मारली. बुलेटवरुन थेट ती पोहचली लग्न मंडपात. कोमल जेव्हा आली तेव्हा सगळेच तिच्याकडे कौतुकाने पाहात होते. कोमलच्या लग्नाचीही चर्चा केडगावात रंगली आहे. 

Read More