Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

रेड्याचा धुमाकूळ, नागरिक आणि वाहनांना धडक

भिवंडी शहरातील बंदर मोहल्ला परिसरात रेड्याने धुमाकूळ घातला. 

 रेड्याचा धुमाकूळ, नागरिक आणि वाहनांना धडक

ठाणे : भिवंडी शहरातील बंदर मोहल्ला परिसरात रेड्याने धुमाकूळ घातला. रस्त्यात येणाऱ्या नागरिकांना तसेच वाहनांना तो धडक मारत होता. रेड्याच्या धुमाकुळामुळे बंदर मोहल्लामधली एक चारचाकी आणि दुचाकी वाहनांचं नुकसान झाले आहे. 

fallbacks

घटनेची सूचना मिळताच भोईवाडा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन ताबडतोब या रेड्याला पकडून भिवंडीतील महापोली परिसरातल्या एका तबेल्यात ठेवण्यात आलं. मात्र पोलिसांनी अज्ञात मालकाचा विरोधात कलम ३३६ प्रमाणे गुन्हा दाखल करून रेड्याच्या मालकाचा शोध पोलीस घेत आहेत.

Read More