Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'आपली बस' सेवा चार दिवसांपासून ठप्प, नागरिक-विद्यार्थ्यांचे अतोनात हाल

नागपुरात गेल्या चार दिवसांपासून 'आपली बस' सेवा अजूनही ठप्पच आहे. शहर बससेवा बंद असल्यानं सर्वासामान्य प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होताय.  

'आपली बस' सेवा चार दिवसांपासून ठप्प, नागरिक-विद्यार्थ्यांचे अतोनात हाल

नागपूर : शहरात गेल्या चार दिवसांपासून 'आपली बस' सेवा अजूनही ठप्पच आहे. शहर बससेवा बंद असल्यानं सर्वासामान्य प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होताय. चार दिवसांपासून शहर बससेवा सुरु करण्याबाबत कोणताच तोडगा निघत नसल्यानं प्रवासी संताप व्यक्त करताय.

'आपली बस' या शहर बस सेवेची जबाबदारी  असलेल्या तीन रेड बस ऑपरेटर्सचे 34 कोटींची थकबाकी न मिळाल्याने शनिवारी सकाळपासून 320 बसची सेवा बंद केली आहे.

याबाबात महापालिकेने थकबाकीतील 1 कोटी प्रत्येकी लगेच देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र ऑपरेटर्सनी प्रत्येकी तीन कोटींची मागणी केली आहे.दरम्यान बस सेवा बंद असल्यानं सर्वसामान्यांचे मात्र प्रचंड हाल सुरुच आहे.

Read More