राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अन्न व नागरी पुरवठा या मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर झी 24 तासच्या 'टु द पॉइंट' या मुलाखतीत सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या रिक्त जागेची जबाबदार छगन भुजबळ यांना देण्यात आली. यावेळी मनोज जरांगे यांनी अजित पवारांनी छगन भुजबळांना मंत्रीपद देऊन चूक केली शी टीका केली. या टीकेवर छगन भुजबळांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
अजित पवारांनी छगन भुजबळांना मंत्रीपद देऊन चूक केली असं म्हटलं आहे. जातीवादी लोकं पोसायची हा काय प्रकार आहे अजित दादांचा. जातीवरुन राजकारण करणाऱ्या लोकांना अजित पवार का मंत्रीपद देत आहेत? असा सवाल देखील मनोज जरांगेंनी अजित पवारांना विचारत छगन भुजबळांवर टीका करत आहेत. एवढंच नव्हे तर अजित पवारांना याची किंमत मोजावी लागेल, असं देखील म्हटलं आहे.
Chhagan Bhujbal On Jarange । कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, जरांगेंना भुजबळांचं सडेतोड उत्तर#chhaganbhujbal #jarangepatil pic.twitter.com/wjP7DRIvPV
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 24, 2025
कावळ्याच्या शापाने गाय मरत नसतात. तसेच प्रत्येकाने आपापली औकात पाहून बोललेलं बरं असतं, असं प्रत्युत्तर छगन भुजबळांनी दिलं आहे. मराठा समाजाच्या लोकांचा भ्रमनिरास झाला. ज्याचा अभ्यास नाही, ज्याला काही माहित नाही त्याच्या मागे सगळे लोकं केलं पण काय झालं? असं प्रत्युत्तर छगन भुजबळांनी दिलं आहे.