Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी 3 न्यायाधीशांवर गुन्हा दाखल

न्यायाधिशांवरच गुन्हा दाखल

हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी 3 न्यायाधीशांवर गुन्हा दाखल

नांदेड : धक्कादायक बातमी नांदेडमधून येत आहे जेथे हुंड्याप्रकरणी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी चक्क तीन न्यायाधीशांवरच गुन्हा दाखल झाला आहे. एकाच कुटुंबातले हे तिघेही न्यायाधीश आहेत. हुंड्याच्या साडे अकरा लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ केल्याचा, तिच्याकडचे ८ लाखांचे दागिने बळजबरीनं काढून घेतल्याचा आरोप या तीन न्यायाधीशांवर आहे. या प्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेचा पती न्यायाधीश शेख वसीम अक्रम, दीर न्यायाधीश शेख अमीर, नंदोई न्यायाधीश शेख जावेदसह एकूण सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दीरांवर विनयभंगाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. 

Read More