Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

नाशिकमध्ये भररस्त्यातून 19 वर्षांच्या तरुणीचं अपहरण; CCTV त कैद झाली धक्कादायक घटना

Nashik Kidnapping: नाशिकमध्ये भरदिवसा 19 वर्षाच्या तरुणीचं अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.   

नाशिकमध्ये भररस्त्यातून 19 वर्षांच्या तरुणीचं अपहरण; CCTV त कैद झाली धक्कादायक घटना

Nashik Kidnapping: नाशिकमध्ये भरदिवसा 19 वर्षाच्या तरुणीचं अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलगी आपल्या आईसोबत असताना चारचाकी वाहनातून आलेल्या आरोपींनी तरुणीचं अपहरण केलं. तरुणीचं अपहरण केल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. सीसीटीव्हीत ही सगळी घटना कैद झाली असून, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिन्नर तालुक्यात ही घटना घडली आहे. 

नाशिकच्या सिन्नर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिन्नर तालुक्यातील पांगरी येथून महिला व तिची 19 वर्षांची मुलगी पायी जात असताना कारमधून आलेल्या आरोपींनी तरुणीचं अपहरण केलं. कारमध्ये आलेल्या वैभव अण्णासाहेब पवार व त्याच्या चार साथीदारांनी मुलीला जबरदस्ती गाडीमध्ये बसवलं. यावेळी तरुणीच्या आईने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपींनी त्यांना मारहाण करत दूर केलं. यादरम्या तिथे रस्त्यावर उभे लोक फक्त पाहत होते. कोणीही तरुणीच्या मदतीसाठी पुढाकार घेतला नाही. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZEE 24 TAAS (@zee24taas)

हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. वावी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More