Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

...तर तुम्हालाही लोकलने प्रवास केल्याबद्दल मिळणार 10 हजार रुपये; टीसीच देणार पैसे

Central Railway 10000 Rs To Passengers: सामान्यपणे तिकीट तपासणीस म्हणजेच टीसी पाहिल्यानंतर प्रवासी त्यांना टाळायला बघतता. मात्र यापुढे असं होणार नाही अशी जोरदार चर्चा एका नव्या योजनेमुळे आहे.

...तर तुम्हालाही लोकलने प्रवास केल्याबद्दल मिळणार 10 हजार रुपये; टीसीच देणार पैसे

Central Railway 10000 Rs To Passengers: तुम्ही लोकल ट्रेनेनं प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण तुम्हाला आता 10 हजारांचं रोख बक्षिस मिळू शकणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून लोकल प्रवाशांना 10 हजारांचं गिफ्ट मिळणार आहे. दररोज 10 हजार रुपये जिंकण्याची संधी लोकल ट्रेनच्या प्रवाशांना एका विशेष योजनेअंतर्गत मिळणार आहे.

10 हजार रोख देणार

सामान्यपणे टीसी म्हणजेच तिकीट तपासणीस म्हटल्यानंतर प्रावसी पळ काढतात किंवा त्यांना टाळायचं प्रयत्न करतात. मात्र आता नव्यानु सुरु करण्यात आलेल्या मोहिमेमध्ये तिकीट काढलेले प्रवासीच टीसीला जाऊन भेटतील की काय अशी चर्चा आहे. कारण आता टीसी तुमच्यावर खुश झाला तर तुम्हाला 10 हजार रुपयांचं बक्षीस मिळू शकतं. टीसी तुमचं तिकीट तपासणार आणि तुमच्याकडे नियमित तिकीट असेल तर तुम्हाला रोख 10 हजार दिले जाणार आहे. एका आठवड्याला प्रवाशांना 50 हजारही जिंकता येणार आहे.

लक्की यात्री योजना

मध्य रेल्वेने लक्की यात्री योजना सुरू केलीय . त्यामाध्यमातून प्रवाशांना रोख पैसे दिले जाणार आहेत... प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये यासाठी ही योजना आखण्यात आलीय.  20 टक्के प्रवासी लोकलमधून विनातिकीट प्रवास करतात. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट काढून प्रवास करावा यासाठी मध्य रेल्वेनं लोकल प्रवाशांसाठी रोख गिफ्टची योजना सुरू केली आहे.

...म्हणून सुरु केली योजना

मध्य रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचा दावा केला आहे. 40 लाख दैनंदिन प्रवाशांपैकी 20 टक्के प्रवाशांकडे तिकीट नसतात. रोजच्या दैनंदिन तपासणीमध्ये 4 ते 5 हजार विनातिकीट प्रवासी आढळून येतात. या प्रवाशांची संख्या कमी करण्यासाठीच ही योजना लागू केली जात आहे.

योजनेतील महत्त्वाचे मुद्दे

> रोज एका प्रवाशाला 10 हजार रुपये रोख रक्कम दिली जाणार.

> दर आठवड्याला 50 हजार रुपयांचं बम्पर प्राइज आठवड्याभरात 10 हजार जिंकलेल्यांपैकी एकाला मिळणार आहे. 

> वेगवेगळ्या स्थानकांवरील टीसी रॅण्डमली विजेता प्रवासी निवडतील.

> योग्य तिकीट असलेल्यांनाच पैसे दिले जाणार आहेत.

 > फर्स्ट क्लास किंवा सेकेंड क्लास असा कोणताही भेदभाव नसून सर्वांसाठी ही योजना असणार आहे. कोणत्याही प्रवाशाची यासाठी निवड होऊ शकते. दैनंदिन तिकीटाबरोबरच मासिक पास असलेले प्रवाशीही यासाठी पात्र ठरतील. 

मध्य रेल्वे मार्गावर शनिवारी पॉवर ब्लॉक 

मध्य रेल्वेवर कल्याण आणि बदलापूरदरम्यानच्या विद्यमान रोड ओव्हर ब्रिजच्या गर्डर्सचे डि-लाँचिंग करण्यासाठी शनिवारी मध्यरात्री विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. नवीन पाइपलाइन पुलाच्या बांधकामासाठी हा ब्लॉक महत्त्वाचा आहे. हा ब्लॉक शनिवार मध्यरात्री १:३० ते रविवार पहाटे ४:३० वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. 

Read More