Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मध्य रेल्वे आणखी ८ विशेष गाड्या सोडणार, पुणे-नांदेड-कोल्हापूर-गोंदियासाठी गाड्या

मध्य रेल्वे आणखी ८ स्पेशल ट्रेन राज्यात सुरु करणार आहे. ११ ऑक्टोबरपासून या ट्रेन धावणार आहेत.  

मध्य रेल्वे आणखी ८ विशेष गाड्या सोडणार, पुणे-नांदेड-कोल्हापूर-गोंदियासाठी गाड्या

मुंबई :  मध्य रेल्वे आणखी ८ स्पेशल ट्रेन राज्यात सुरु करणार आहे. ११ ऑक्टोबरपासून या ट्रेन धावणार आहेत.  मुंबई-कोल्हापूर, मुंबई-लातूर, पुणे-नागपूर, पुणे-अमरावती, मुंबई-नांदेड या रेल्वे धावणार आहेत. कोरोनामुळे रेल्वे सेवा बंद आहे. काही विशेष गाड्या सुरु ठेवण्यात आल्या आहेत. आता मध्य रेल्वेने मोठी घोषणा केली आहे.

याआधी मुंबईहून पुणे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूरसाठी काही गाड्या उद्यापासून सुरु होत आहेत. या गाड्या शुक्रवार ९ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. त्यामुळे रेल्वे सेवेअभावी कोंडीत सापडलेल्या राज्यातील जनतेला काही प्रमाणात दिलासा मध्य रेल्वेकडून मिळणार आहे. पाच एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्याचा निर्णय मध्ये रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

मध्य रेल्वे  राज्यामध्ये आणखी विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या मध्य रेल्वे ११ऑक्टोबरपासून सुरु करणार आहे. दरम्यान, उद्यापासून पाच रेल्वे गाड्या सुरु होणार आहेत. त्याचे आरक्षण आजपासून सुरु करण्यात आले होते. डेक्कन क्वीन, इंद्रायणी, नागपूर दुरांतो, विदर्भ आणि सिद्धेश्वर एक्स्प्रेस या गाड्या ९ ऑक्टोबरपासून धावणार आहेत. या गाड्या कोरोना काळात विशेष ट्रेन म्हणून चालवल्या जाणार आहेत. आता आणखी आठ गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत.

 मुंबई-कोल्हापूर ही विशेष गाडी दररोज धावणार आहे.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कोल्हापूरसाठी रवाना होईल. ही गाडी परतीसाठी सुरु राहणार आहे. मुंबई-लातूर सुपरफास्ट विशेष आठवड्यात चार दिवस धावणार आहे. ही सुपरफास्ट विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दर सोमवारी, मंगळवार, गुरुवार आणि रविवारी  लातूरसाठी रवाना होईल. तसेच ही गाडी परतीसाठी सुरु राहणार आहे.

 पुणे-नागपूर एसी स्पेशल साप्ताहिक गाडी सोडण्यात येणार आहे. तसेच पुण्यातून पुणे-अजनी एसी स्पेशल साप्ताहिक आणि पुणे-अमरावती एसी स्पेशल साप्ताहिक गाडी सुरु करण्यात येणार आहे. तर अजनी-पुणे एसी स्पेशल साप्ताहिक सोडण्यात येणार आहे. तसेच कोल्हापूरमधून गोंदियासाठी गाडी सोडण्यात येणार आहे. श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर-गोंदिया विशेष दररोज गाडी धावेल. 

तसेच  मुंबई- हजूर साहिब नांदेड विशेष दररोज गाडी धावणार आहे. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, लासलगाव, मनमाड, नगरसोल, रोटेगाव, लातूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी आणि पूर्णा असे थांबे असतील. 

Read More